नवा गडी नवं राज्य:अनिता दातेला मिळणार चिमुकल्या कार्तिकीची साथ; नव्या मालिकेत साईशाची महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 06:40 PM2022-07-10T18:40:30+5:302022-07-10T18:41:14+5:30

Saisha bhoir: 'रंग माझा वेगळा' या मालिकेत साईशाने, कार्तिकी ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांना उदंड प्रतिसादही दिला होता. मात्र, मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच तिने मालिका सोडली.

ranga maza wegla fame child artist saisha bhoir new upcoming serial Nava Gadi Nava Rajya | नवा गडी नवं राज्य:अनिता दातेला मिळणार चिमुकल्या कार्तिकीची साथ; नव्या मालिकेत साईशाची महत्त्वपूर्ण भूमिका

नवा गडी नवं राज्य:अनिता दातेला मिळणार चिमुकल्या कार्तिकीची साथ; नव्या मालिकेत साईशाची महत्त्वपूर्ण भूमिका

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) या मालिकेला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळेच ही मालिका आज लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेतून बालकलाकार साईशा भोईर (saisha bhoir) हिने अलिकडेच एक्झिट घेतली. मात्र, साईशा आता लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'रंग माझा वेगळा' या मालिकेत साईशाने, कार्तिकी ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांना उदंड प्रतिसादही दिला होता. मात्र, मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच तिने मालिका सोडली. विशेष म्हणजे या मालिकेनंतर आता साईशाला पुन्हा कधी पाहायला मिळणार असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. मात्र, आता प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. साईशा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेसंदर्भातील एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टनुसार, साईशा लवकरच झी मराठीवरील 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या निमित्ताने साईशा पहिल्यांदाच अभिनेत्री अनिता दातेसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे या मालिकेत साईशाची भूमिका नेमकी कशी असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: ranga maza wegla fame child artist saisha bhoir new upcoming serial Nava Gadi Nava Rajya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.