घाडगे & सूनमध्ये रंगणार “रंगपंचमीचा खेळ”

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 09:16 AM2018-02-28T09:16:50+5:302018-02-28T14:46:50+5:30

कलर्स मराठीवरील घाडगे & सून मालिकेमध्ये अमृता आणि अक्षय नुकतेच जेजुरीहून परतले आहेत. आणि आता घाडगे परिवारामध्ये चाहूल लागली ...

"Rangpurcham Khela" will be played in Ghadge & Soon | घाडगे & सूनमध्ये रंगणार “रंगपंचमीचा खेळ”

घाडगे & सूनमध्ये रंगणार “रंगपंचमीचा खेळ”

googlenewsNext
र्स मराठीवरील घाडगे & सून मालिकेमध्ये अमृता आणि अक्षय नुकतेच जेजुरीहून परतले आहेत. आणि आता घाडगे परिवारामध्ये चाहूल लागली आहे ती म्हणजे होळी आणि रंगपंचमीची या सणाची... घाडगे सदनमध्ये प्रत्येक सण जोरात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. अक्षय आणि अमृताची हि पहिलीच रंगपंचमी म्हणजे ती इतर सणांप्रमाणे जोरात साजरी होणार यात शंकाच नाही. होळीच्या आगीमध्ये वाईट विचार, संकंट जाळून राख करावी अशी मान्यता आहे. या होळी आणि रंगपंचमीच्या शुभ मुहूर्तावर अक्षय आणि अमृताच्या आयुष्यातील सगळी संकंट दूर होऊन या दोघांवर प्रेमाचा रंग चढेल ? हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

कियाराचे लग्न अर्जुनशी झाले आहे ही बातमी अक्षयला कळताच अक्षय अस्वस्थ होतो... पण, ते लग्न कुठल्या परिस्थितीत झाले आहे हे अक्षयला अजूनही कळलेले नाही. परंतु घाडगे परिवारामध्ये  अत्यंत आनंदी वातावरण आहे. तर, अमृता मात्र अक्षयसाठी खूप चिंतीत आहे, कि अक्षय आता काय करेल ? हा प्रश्न अमृताला राहून राहून त्रास देतो आहे. पण, रंगपंचमीच्या शुभ मुहूर्तावर अक्षय अमृताला एक सरप्राईझ देणार आहे. किचनमधल्या रोजच्या वापरातल्या गोष्टींचा एक वेगळा  रंग तो अमृताला दाखवणार आहे. आता हे सरप्राईझ काय असणार आहे ? नक्की अक्षय काय करणार आहे ? तर रंगपंचमीच्या मुहूर्तावर अमृतावर चढणार का अक्षयचा प्रेमाचा अनोखा रंग ?

काही दिवसांपूर्वीच  अक्षय आणि अमृताला जेजुरीला जाऊन आले.  मंदिराच्या ४०० पायऱ्या चढायच्या होत्या परंतु अमृताच्या पायाला अचानक लागल्यामुळे अक्षयने अमृताला उचलून घेतले आणि खरोखरच सीन मध्ये चिन्मयने मंदिराच्या ३०० पायऱ्या चढल्या. अक्षयच्या प्रेमात पडलेल्या अमृतासाठी मात्र हा विधी एका नव्या नात्याची सुरुवात करून देणारा क्षण ठरला. 

Web Title: "Rangpurcham Khela" will be played in Ghadge & Soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.