राणी मुखर्जीवर का आली करण जोहरचा 'इंडियाज नेक्स सुपरस्टार' शो अर्धवट सोडून जाण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 05:28 AM2018-01-30T05:28:55+5:302018-01-30T10:58:55+5:30

राणी मुखर्जी लवकरच हिचकी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ...

Rani Mukherjee's Coming Soon Time to leave for Johar's 'India's NEXUS Superstar' show partially released | राणी मुखर्जीवर का आली करण जोहरचा 'इंडियाज नेक्स सुपरस्टार' शो अर्धवट सोडून जाण्याची वेळ

राणी मुखर्जीवर का आली करण जोहरचा 'इंडियाज नेक्स सुपरस्टार' शो अर्धवट सोडून जाण्याची वेळ

googlenewsNext
णी मुखर्जी लवकरच हिचकी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती करण जोहर आणि रोहित शेट्टीचा रिअॅलिटी शो 'इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार'मध्ये येणार होती. मिळालेल्या माहिती नुसार राणीसुद्धा या शोमध्ये जायला उत्सुक होती. २०१३ मध्ये आलेल्या बॉम्बे टॉकीज चित्रपटानंतर करण आणि राणीच्या तब्बल 5 वर्षांनी एकत्र दिसणार होते. राणी एपिसोडच्या शूटसाठी लोकेशनवर पोहोचली सुद्धा मात्र अचनाक तिची तब्येत बिघडली. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार ज्यावेळी राणी इंडियाज नेक्स सुपरस्टारच्या मंचावर शूटिंगसाठी तयार होत होती त्यावेळी अचानक तिचे पाठिचे दुखणे सुरु झाले. पाठिचे दुखणे ऐवढे वाढले की शूट केल्याशिवायच ती तिथून निघून गेली. त्यानंतर तिला डॉक्टरांना दाखवण्यात आले. 

ALSO READ :  ​ trailer out : राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’चा ट्रेलर असा तर चित्रपट कसा असेल?

गेल्या तीन दिवसांपासून राणीला पाठीचा दुखणे त्रास देते. तरी ही तिने शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र अचानक दुखणे वाढल्याने तिला शूटिंग पूर्ण करता आली नाही.  राणी गेल्या अनेक वर्षांपासून स्क्रिनपासून दूर होती. यशराज बॅनरच्या चित्रपटातून ती कमबॅकसाठी तयार आहे. राणी आपल्या या चित्रपटाला घेऊन खूपच एक्साईडेट हिचकी चित्रपटात राणी मुखर्जी नैना माथूर नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. नैनाला  टॉरेट सिंड्रोमने नावाच्या आजाराने ग्रासलेले असते. त्यामुळी ती बोलताना अडखळते आणि एकच वाक्य दोन वेळा बोलते. तसेच बोलता बोलता विचित्र आवाज काढते, तिच्या या सवयीमुळे तिच्या आयुष्यात काशी आव्हान येतात आणि त्यांना ती कशी सामोरे जाऊन ती मात करते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्याच बरोबर समाजात कमजोर व्यक्ती आणि कणखर व्यक्ती ह्यात चालू असलेला भेदभाव यात दिसून येईल. नैनाची शिक्षिका बनायची इच्छा आहे पण तीच्या आजारपणा मुळे ती शिक्षिका होऊ शकत नाही हे तिला सांगण्यात येते. इथून पुढे तिच्या संघर्षाची गोष्ट सुरु होते.  महेश शर्मा निर्मित आणि सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित हा चित्रपट २३फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Rani Mukherjee's Coming Soon Time to leave for Johar's 'India's NEXUS Superstar' show partially released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.