'राजा राणीची गं जोडी' मालिकेत रणजीत करणार दुसरं लग्न?; या अभिनेत्रीची होणार एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 15:02 IST2021-12-13T15:02:14+5:302021-12-13T15:02:38+5:30
Raja Ranichi Ga Jodi: 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेत लवकरच नविन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

'राजा राणीची गं जोडी' मालिकेत रणजीत करणार दुसरं लग्न?; या अभिनेत्रीची होणार एन्ट्री
राजा राणीची गं जोडी या मालिकेत लवकरच नविन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत ऐन निवडणुकीच्या दिवशीच रणजीत पुण्याला निघून गेला होता, तो कुठे गेला होता याचा त्याने संजीवनीला अजूनही खुलासा केलेला नाही. पुण्यात झालेल्या स्फोटाचा खुलासा करण्याची जबाबदारी आता रणजीतवर आली आहे. हे मिशन तो कसे पूर्ण करतो याची उत्कंठा आहे. मात्र दुसरीकडे देशाच्या रक्षणासाठी रणजीत सज्ज झालेला पाहायला मिळतो आहे आणि या मिशनमध्ये त्याला साक्षी साथ देणार आहे. आता साक्षी या नव्या पात्राची मालिकेत एन्ट्री झाली आहे.
नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात रणजीत आणि साक्षी एका लग्नाच्या हॉलमध्ये उभे असलेले पाहायला मिळतात. संजीव आणि राधिका यांचा तिथे लग्न सोहळा पार पडणार आहे. हा एक मिशनचाच भाग असल्याचे म्हटले जात आहे. रणजीत आता संजीव आणि साक्षी आता राधिका बनून हे मिशन पार पाडणार आहेत. संजीव आणि राधिका बनून हे दोघे आता कोणती नवी खेळी खेळणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. मात्र या मिशनचा खुलासा कधी होणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तूर्तास रणजित मात्र साक्षीसोबत लग्न करणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे. रणजितच्या दुसऱ्या लग्नाचा ठाव संजीवनीला लागणार का की तिला याबाबत काहीच कळून देणार नाही हे येत्या भागातच अधिक स्पष्ट होईल.
अनघा अभिनेत्रीशिवाय आहे लेखिका, दिग्दर्शिकादेखील
साक्षीची भूमिका अभिनेत्री अनघा काकडे ही साकारते आहे. अनघा अभिनेत्रीशिवाय लेखिका, दिग्दर्शिकादेखील आहे. मॉडर्न कॉलेजमधून तिने पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. दिगपाल लांजेकर यांच्या नेतृत्वाखाली तिने अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. रसिक या एकांकिकासाठी अनघाला लेखन आणि अभिनयाचा माई भिडे पुरस्कार मिळाला आहे. क्षणपतूर शुवकालीन मावळी अंगाईचे दिग्दर्शन आणि कन्सेप्ट स्वतः अनघाने निभावले होते. कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धेच्या वेळी शरद पोंक्षे तिथे हजर होते . त्यांनी मालिकेत काम मिळावे म्हणून अनघाचे नाव अनेकांना सुचवले होते. यातून तिला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती.