माध्यमांचा घेराव, कडक सुरक्षाव्यवस्थेत गुवाहाटी सायबर पोलीस स्थानकात पोहोचला रणवीर अलाहाबादिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:51 IST2025-03-07T15:50:07+5:302025-03-07T15:51:42+5:30
रणवीर अलाहबादियाची कसून चौकशी

माध्यमांचा घेराव, कडक सुरक्षाव्यवस्थेत गुवाहाटी सायबर पोलीस स्थानकात पोहोचला रणवीर अलाहाबादिया
'इंडियाज गॉट लेटेंट' शोनंतर वादात अडकलेला युट्यूबर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) नुकताच गुवाहाटी क्राइम ब्रांचसमोर हजर झाला होता. सध्या तो कायदेशीर प्रक्रियांमधून जात आहे. कालच रणवीरने राष्ट्रीय महिला आयोगासमोर येत त्याची बाजू मांडली होती. तर आज तो गुवाहाटी सायबर पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. तिथे त्याने त्याचा जबाब नोंदवला. रणवीर अलाहाबादियाला पोलिस स्थानकात पोहोचतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
एएनआयने रणवीर अलाहाबादियाचा व्हिडिओ शेअर केला आहे. युट्यूबर अलाहाबादिया आपल्या पांढऱ्या कारमधून उतरतो. त्याला अनेक लोकांनी घेराव घातलेलाही दिसत आगे. माध्यमे, सुरक्षाकर्मींच्या गर्दीत तो सायबर पोलिस स्टेशनमध्ये जाताना दिसत आहे. रणवीरला पोलिसांनी अनेक प्रश्न विचारले. मात्र त्याने काही प्रश्नांची उत्तरं दिलीच नाहीत अशीही माहिती समोर येत आहे.
#WATCH | Assam: YouTuber Ranveer Allahabadia reaches at the office of Crime Branch, Guwahati Police Commissionerate in Guwahati in connection with a case related to India's Got Latent show.
— ANI (@ANI) March 7, 2025
Earlier on February 27, Youtuber Ashish Chanchlani, one of the accused in the case of… pic.twitter.com/KmFu9Cwbhd
यापूर्वी २७ फेब्रुवारी रोजी आशिष चंचलानी सुद्धा गुवाहाटी क्राइम ब्रांचसमोर हजर झाला होता. लेटेंट शोमधील सर्वांना आतापर्यंत माफी मागितली आहे. तर दुसरीकडे रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा पॉडकास्ट करण्याची परवानगी दिली आहे. मात्र कशी भाषा वापरावी यावरुन त्याला फटकारलं आहे आणि यापुढे काळजी घेण्यास सांगितलं आहे.