रणवीर शौरीने मोडला बिग बॉसचा 'हा' महत्वाचा नियम, मेकर्सने पाठीशी घातल्याचा इतरांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 13:34 IST2024-07-03T13:34:20+5:302024-07-03T13:34:48+5:30
आधीच रणवीरला मेकर्स खूपच पाठीशी घालतात असा इतर स्पर्धक दावा करत होते. तर आता या फोटोवरुन हे स्पष्टच झालं आहे.

रणवीर शौरीने मोडला बिग बॉसचा 'हा' महत्वाचा नियम, मेकर्सने पाठीशी घातल्याचा इतरांचा दावा
बिग बॉस ओटीटी 3 (Bigg Boss OTT 3) स्पर्धक अभिनेता रणवीर शौरीने (Ranvir Shorey) बिग बॉसचा नियम तोडला आहे. आधीच रणवीरला मेकर्स खूपच पाठीशी घालतात असा इतर स्पर्धक दावा करत होते. तर आता व्हायरल फोटोत रणवीर शौरी लिव्हिंग एरियामध्येच स्मोकिंग करताना दिसत आहे. जिथे स्मोकिंगची परवानगी नाही तिथेच तो स्मोक करत असल्याने त्याच्यावर टीका होत आहे.
रणवीर शौरी लिव्हिंग एरियामध्ये साई केतन रावसोबत बसलेला दिसत आहे. गप्पा मारत असताना रणवीरच्या हातात सिग्रेट दिसत आहे. घरात लिव्हिंग एरिया, किचन, बेडरुम असं कुठेही स्मोकिंग करु शकत नाही हा बिग बॉसच्या घरातला सर्वात मोठा आणि महत्वाचा नियम आहे. रणवीर स्मोकिंग करत असताना बिग बॉसनेही त्याला रोखलं नाही आणि त्याच्याविरोधात काहीच कारवाईही केली गेली नाही.
बिग बॉसच्या घरात आधीपासूनच गार्डनर एरियाजवळ स्मोकिंग रुम आहे. स्पर्धक तिथेच जाऊन स्मोक करतात. याआधी बिग बॉस 16 मध्ये साजिद खानने नियम तोडला होता आणि तेव्हा बिग बॉसने त्याला नियम पाळण्यास सांगितलं होतं.
बिग बॉसच्या पहिल्याच आठवड्यात रणवीर शौरीची स्तुती झाली होती. अनिल कपूरने त्याला पाठिंबा दिला होता. यावरुन रणवीरला खूप फेवर केलं जात असल्याचा काही स्पर्धकांनी दावा केला. सध्या बिग बॉसमधून अरमान मलिकची पहिली पत्नी पायलचं एव्हिक्शन झालं आहे. तसंच पौलोमी दासही आता बाहेर पडली आहे.