नंदिशसोबत घटस्फोट झाल्यानंतर 'उतरन' फेम रश्मी देसाई करतेय या अभिनेत्याला डेट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 19:00 IST2019-08-17T19:00:00+5:302019-08-17T19:00:00+5:30
'उतरन' फेम अभिनेत्री रश्मी देसाई सध्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एका अभिनेत्याला डेट करत असल्याचं समजतं आहे.

नंदिशसोबत घटस्फोट झाल्यानंतर 'उतरन' फेम रश्मी देसाई करतेय या अभिनेत्याला डेट?
'उतरन' फेम अभिनेत्री रश्मी देसाई पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं समजतं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रश्मी हिऱ्यांचा व्यापारी ते अभिनेता असा प्रवास करणाऱ्या अरहान खानला डेट करत आहे. रश्मीने २०१५ साली अभिनेता नंदीश संधूला घटस्फोट दिला.
अरहानने दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं असून तो 'बढ़ो बहू' मालिकेतही झळकला होता. सूत्रांच्या माहितीनुसार रश्मी व अरहान २०१७ साली भेटले. मागील वर्षी युविका चौधरी व प्रिंस नरूला यांच्या लग्नात त्यांचे बॉण्डिंग खूप चांगलं झालं आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघं एकत्र परफेक्ट वाटतात. दोघंही मॅच्युएर आहेत आणि एकमेकांना घेऊन सीरियस आहेत. आगामी वर्षांत ते दोघं लग्नबेडीत अडकू शकतात. रश्मी व अरहान यांना त्यांचं नातं सीक्रेट ठेवायचं आहे.
अरहानसोबतच्या नात्याबद्दल रश्मीनं सांगितलं की, अरहान माझा खूप चांगला मित्र आहे आणि फॅमिलीसारखा आहे. तर अरहानने सांगितलं की, मी रश्मीचं कौतूक यासाठी करतो की ती सेल्फ मेड महिला आहे. आम्ही खूप चांगला मित्र आहोत.
रश्मी व अरहानला बिग बॉससाठी विचारण्यात आलं आहे. मात्र ते या शोमध्ये सहभागी होणार आहेत की नाही, याचा खुलासा झालेला नाही.