'बाहेर बिग बॉस खेळू नका'; विकीच्या आईवर संतापली रश्मी देसाई; टोचले अंकिताच्या सासूचे कान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 01:21 PM2024-01-11T13:21:34+5:302024-01-11T13:22:03+5:30

Rashami desai: रश्मीने अंकिताला पाठिंबा दिला असून तिच्या सासूची चांगलीच कानउघडणी केली आहे.

rashami-desai-support-to-ankita-lokhande-reacted-to-vicky-jain-mother-bahar-aake-bigg-boss-na-khele | 'बाहेर बिग बॉस खेळू नका'; विकीच्या आईवर संतापली रश्मी देसाई; टोचले अंकिताच्या सासूचे कान

'बाहेर बिग बॉस खेळू नका'; विकीच्या आईवर संतापली रश्मी देसाई; टोचले अंकिताच्या सासूचे कान

 छोट्या पडद्यावरील बिग बॉस या रिअॅलिटी शोचं 17 वं (bigg boss 17) पर्व सध्या चांगलंच गाजताना दिसत आहे. यंदाच्या पर्वात घरात रंगणाऱ्या टास्क पेक्षा त्यात सहभागी झालेले कलाकार सर्वाधिक चर्चेत येत आहेत. यामध्येच अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही जोडी तर हा शो सुरु झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेचा विषय ठरत आहेत.  विशेष म्हणजे आता या शोमुळे अंकिताची सासू चर्चेत आली आहे. अंकिताच्या सासूने तिच्यावर अनेक आरोप केले असून तिला ट्रोल केलं आहे. विकीच्या आईचं हे वागणं पाहून अभिनेत्री रश्मी देसाई हिने आता त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

अलिकडेच या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या कुटुंबियांनी हजेरी लावली होती. यावेळी अंकिताची सासू सुद्धा विकी आणि अंकिताला भेटण्यासाठी आली होती. मात्र, यावेळी घरात गेल्यानंतर त्यांनी अंकिताला सगळ्यांसमोर बरंच काही सुनावलं. इतकंच नाही तर या शोमधून बाहेर आल्यानंतरही त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये अंकितावर अनेक आरोप केले. तिच्याविरोधात अनेक वक्तव्ये केली. त्यामुळेच आता अंकिताच्या मदतीला तिची मैत्रीण रश्मी देसाई धावून आली आहे. रश्मीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत विकीच्या आईला चांगलंच सुनावलं आहे.

काय म्हणाली रश्मी देसाई?

"तुझ्यातल्या निर्भीड स्वभावामुळेच आज तू आहेस अंकिता. तू जशी आहेस तशी रहा. तू जशी आहेस तशीच मला आवडतेस. तू अनेक वेगवेगळ्या परिस्थितीमधून गेली आहेस. त्यामुळे तू ज्याच्यावर प्रेम करतेस आणि जो तुझ्यावर प्रेम करतो त्या सगळ्यांसाठीच हे फार महत्त्वाचं आहे. मोठ्या कष्टाने तू सारं काही उभं केलं आहेस. अंकिता तुला मिळालेल्या या निर्भीड स्वभावामुळेच तू इतकी स्ट्राँग झाली आहेस", असं रश्मी म्हणाली.

रश्मीने टोचले विकीच्या आईचे कान

"तुला हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. पण मिळत असलेल्या प्रेमासोबतच तू या गोष्टींचाही स्वीकार केलास. आशा आहे की, तुझे कुटुंबीय सुद्धा समजतील की हा शो संपणार आहे. आणि हा फक्त अंकितासाठी नव्हता तर दोघांसाठी होता. त्यामुळे ते दोघंही मॅच्युअर असल्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम्स सोडवू शकतात. मला हे चांगलंच माहितीये, काकू, तुम्हाला कदाचित हे वाईट वाटेल पण ते दोघे माझे चांगले मित्र आहेत. ते बिग बॉसचा एक भाग, एक स्पर्धक आहेत. त्यामुळे तुम्ही बाहेर येऊन बिग बॉस खेळू नका."

दरम्यान, बिग बॉसच्या घरात गेलेल्या विकीच्या आईने अंकिताचं भावनिक खच्चीकरण करायचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर अलिकडेच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्येही त्यांनी अंकितावर अनेक आरोप केले. त्यामुळे सध्या अंकिताची सासू चर्चेत येत आहे.

Web Title: rashami-desai-support-to-ankita-lokhande-reacted-to-vicky-jain-mother-bahar-aake-bigg-boss-na-khele

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.