'या' लोकप्रिय अभिनेत्रीला झाला 'असा' आजार ज्यावर काहीच नाही उपचार; संपू शकतं करियर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 03:33 PM2023-03-23T15:33:07+5:302023-03-23T15:33:39+5:30

गेल्या चार पाच वर्षांपासून या आजाराचा सामना करत आहे.

Ratan Rajputh shocking truth living with rare disease talks about treatment lifestyle tv industry break | 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला झाला 'असा' आजार ज्यावर काहीच नाही उपचार; संपू शकतं करियर

'या' लोकप्रिय अभिनेत्रीला झाला 'असा' आजार ज्यावर काहीच नाही उपचार; संपू शकतं करियर

googlenewsNext

अभिनेत्री रतन राजपूतने गेल्या तीन वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला आहे. सध्या ती रोड ट्रिपवर निघाली असून उत्तराखंड फिरत आहे. रतनने आपल्या एका व्हिडीओमध्ये तिच्यामध्ये फिरण्याची आवड कशी निर्माण झाली ते सांगितलं आहे. आपलं सीक्रेट उघड करतानाच तिने आपल्या आयुष्याबद्दलचं एक मोठं सत्य सांगितलं आहे. अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तिची तब्येत बिघडली होती. 

एक महिन्यानंतर रतनाला समजलं की तिला असा आजार झाला आहे ज्यावर काहीच उपचार नाही. हे ऐकल्यावर तिला मोठा धक्का बसला. रतनच्या डोळ्यांना ऑटो इम्यून सिस्टम हा आजार झाला आहे. यामध्ये स्टेरॉईड देण्यात येतात. यामुळे तिला प्रकाशाचा सामना करताना त्रास होऊ लागला. तिच्यासाठी जगणं खूप अवघड झालं. या आजारामुळेच ती कायम गंभीर राहू लागली. 

एक दिवस रतनने विचार केला की जोपर्यंत ती डोळ्यांनी पाहू शकते तोपर्यंत ती हे आयुष्य अगदी आनंदाने एन्जॉय करेल. तेव्हापासून ती प्रवास करायला लागली आणि जग फिरण्यास सुरुवात केली. यामुळे तिची दृष्टी आणखी चांगली झाली आहे. आता ती सूर्यप्रकाशाचा सामना करी शकतो. तसेच तिने मध्यंतरी शूटिंग देखील केले आहे. 

रतन गेल्या चार पाच वर्षांपासून या आजाराचा सामना करत आहे. यातून ठीक होण्यासाठी ती ट्रॅव्हलिंग, योग, न्युरोथेरपीची मदत घेत आहे. तसेच होमोपॅथी औषध देखील घेत आहे. ती आजारातून बरी झाली होती. पण पुन्हा औषधांच्या साईड इफेक्टमुळे तिला ऑटो इम्यून सिस्टम झाला आहे. पण ती आता या आजाराशी लढा देत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: Ratan Rajputh shocking truth living with rare disease talks about treatment lifestyle tv industry break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.