"एखाद्याला निरोप देताना आपण सहज “टा-टा” म्हणतो, पण तुम्हाला...", रतन टाटा यांच्या निधनानंतर कुशल बद्रिकेची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 09:22 AM2024-10-10T09:22:18+5:302024-10-10T09:23:50+5:30

रतन टाटा यांच्या निधनाने  संपूर्ण देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मराठी अभिनेता कुशल बद्रिकेनेही रतन टाटा यांच्या निधनानंतर भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

ratan tata passed away at the age of 86 marathi actor kushal badrike shared post | "एखाद्याला निरोप देताना आपण सहज “टा-टा” म्हणतो, पण तुम्हाला...", रतन टाटा यांच्या निधनानंतर कुशल बद्रिकेची पोस्ट

"एखाद्याला निरोप देताना आपण सहज “टा-टा” म्हणतो, पण तुम्हाला...", रतन टाटा यांच्या निधनानंतर कुशल बद्रिकेची पोस्ट

Ratan Tata Demise: ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाने  संपूर्ण देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मराठी अभिनेता कुशल बद्रिकेनेही रतन टाटा यांच्या निधनानंतर भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

कुशलने त्याच्या सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत रतन टाटा यांना आदरांजली वाहिली आहे. कुशलने अगदी मोजक्या शब्दांत डोळ्यांत पाणी आणणारी ही पोस्ट लिहिली आहे. 

कुशल बद्रिकेची पोस्ट 

एखाद्याला निरोप देताना आपण सहज “टा-टा” म्हणतो, पण “रतन टाटा” सर, तुम्हाला सहज निरोप देता येत नाहीये. 

 

तुम्ही देशाला नुसतं फोनने नाही तर माणुसकीने जोडलंत, माणसांमधल्या cancerच्या तारा कापून, इलेक्ट्रिकच्या तारांनी देश जगवलात. 

तुम्ही बनवलेल्या गाड्या जर भारतातल्या रस्त्यावरून धाऊ शकतात तर त्यातून आम्ही चंद्रावर सुद्धा सहज प्रवास करू अशी मला खात्री वाटते. भारताला सुजलाम सुफलाम म्हणतात ते तुमच्या सारख्या महान व्यक्तींमुळेच.

“रतन टाटा” सर तसा आपला वैयक्तिक असा कधी संबंध आला नाही. लेकिन, मैने आपका नमक खाया है ! 

आणि संबंधाचं म्हणाल तर “देवा” सोबत ही माझा वयक्तिक असा कधी संबंध आला नाही, पण त्याचे अनंत उपकार कधीच विसरता येणार नाहीत. आणि तुमचे सुद्धा.


टाटा समूहाने दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांचे पार्थिव आज दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स लॉनमध्ये सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी लोकांना रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

Web Title: ratan tata passed away at the age of 86 marathi actor kushal badrike shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.