मराठी अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वत:चं घर, शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो
By कोमल खांबे | Updated: March 28, 2025 09:03 IST2025-03-28T09:03:09+5:302025-03-28T09:03:49+5:30
एका मराठी अभिनेत्रीने तिचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीने नुकतंच मुंबईत घर खरेदी केलं आहे.

मराठी अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वत:चं घर, शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो
स्वप्ननगरी मुंबईत स्वत:चं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण, मुंबईत घर घेणं हे सहसा शक्य होत नाही. मुंबईतील घरांच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या किमती पाहता अनेकांचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. पण, एका मराठी अभिनेत्रीने तिचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीने नुकतंच मुंबईत घर खरेदी केलं आहे.
'रात्रीस खेळ चाले' मधून अभिनेत्री नुपूर चितळे घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने देविकाची भूमिका साकारली होती. नुपूरला या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. नुपूरचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात असते. नवीन घर घेतल्याची गुडन्यूजही तिने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. नुपूरने गृहप्रवेशाचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
आई-वडिलांच्या हातून नुपूरने गृहप्रवेश केला. गृहप्रवेशासाठी अभिनेत्रीने खास पारंपरिक लूक केला होता. तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. हे फोटो शेअर करत नुपूरने 'Newness 26.03.2025' असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनीही शुभेच्छा देत अभिनेत्रीचं अभिनंदन केलं आहे.