कुठे हरवली 'रात्रीस खेळ चाले'मधली निलिमा?; आता ओळखणंही झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 14:15 IST2023-06-27T14:15:04+5:302023-06-27T14:15:32+5:30
Ratris khel chale: रात्रीस खेळ चालेमध्ये निलिमा ही भूमिका साकारुन प्राची प्रकाशझोतात आली.

कुठे हरवली 'रात्रीस खेळ चाले'मधली निलिमा?; आता ओळखणंही झालंय कठीण
छोट्या पडद्यावर चांगलीच गाजलेली लोकप्रिय मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले(ratris khel chale). उत्तम कथानक आणि त्याला साजेसा कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका चांगलीच गाजली. ही मालिका संपून आता बरेच दिवस उलटले आहेत. मात्र, तरीदेखील त्यातील कलाकारांची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगते. यात सध्या मालिकेतील निलिमा म्हणजेच अभिनेत्री प्राची सुखटणकर (prachi sukhatankar) हिची चर्चा रंगली आहे.
लोकप्रिय अभिनेत्री प्राची सुखटणकर हिने रात्रीस खेळ चाले या मालिकेत निलिमा ही भूमिका साकारली होती. मात्र, ही मालिका संपल्यानंतर प्राची फारशी कुठेही दिसलेली नाही. त्यामुळे सध्या ती काय करते, कशी दिसते असे प्रश्न नेटकऱ्यांना पडतात.
रात्रीस खेळ चाले या मालिकेनंतर प्राची तू माझा सांगाती या मालिकेत झळकली. या मालिकेत तिने हिरा ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फारशी कुठे दिसली नाही. मात्र, प्राचीने मराठी कलाविश्वात बऱ्याच मालिका आणि सिनेमात काम केलं आहे. शुभ लग्न सावधान या सिनेमात तिने छोटेखानी भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने अभिनयाकडे पाठ फिरवल्याचं म्हटलं जातं.
दरम्यान, सध्या तरी प्राची कोणत्याही सिनेमा वा मालिकेत झळकलेली नाही. तसंच ती सोशल मीडियावरही फारशी अॅक्टिव्ह नाही. त्यामुळे सध्या ती तिचा सगळा वेळ कुटुंबासाठी देत आहे.