'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरने गोरगरीबांसाठी केलेल्या 'या' कामाची होतेय प्रशंसा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 06:06 PM2021-11-17T18:06:11+5:302021-11-17T18:06:38+5:30

अपूर्वा नेमळेकर हिने 'अंधारात हरवलेल्यांसाठी प्रकाश व्हा...' म्हणत गरिबांना जेवायला देखील घातले आहे

'Ratris Khel Chale' fame Shevanta alias Apoorva Nemalekar's work for the poor is being praised | 'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरने गोरगरीबांसाठी केलेल्या 'या' कामाची होतेय प्रशंसा

'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरने गोरगरीबांसाठी केलेल्या 'या' कामाची होतेय प्रशंसा

googlenewsNext

रात्रीस खेळ चाले मालिकेतून शेवंताच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने साताऱ्यात आपल्या नव्या बिझनेसची सुरूवात काही दिवसांपूर्वी केली होती. तिने अपूर्वा कलेक्शन नावाने साड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे आणि त्यात तिला चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे. आपल्या परिसराने जे काही आपल्याला दिले त्याबद्दल आपण त्याला काही देणे लागतो अशी चांगली भावना ठेवत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यातून तिने गोरगरीबांसाठी केलेली मदत पाहून तिचे चाहते तिची खूप प्रशंसा करत आहेत. 

सातारा परिसरातील अत्यंत गरीब वयस्कर भीक मागणाऱ्या लोकांची दिवाळी तिने गोड केलेली पाहायला मिळते. काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती म्हणाली की, समाजातील गरीब आणि दुर्लक्षित भीक मागणाऱ्या वयस्कर, अनाथ अशा लोकांचे पालनपोषण करणे, त्यांना,शासनाकडून जेवण, कपडे, निवास या सुविधा देऊन, त्यांच्या राहणीमानात सुधारणा करणे, वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य सरकार कडून भिक्षेकरी गृह मार्फत केल जाते. मी अपूर्वा कलेक्शन्स या उपक्रमाची सातारामध्ये नव्याने सुरुवात केली.

अपूर्वाने पुढे म्हटले की, आपल्या परिसराने जे काही आपल्याला दिले त्याबद्दल आपण त्याला काही देणे लागतो. या दिवाळीत सातारा येथे असलेल्या पुरुष भिक्षेकरी गृहात जाऊन मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्यांची जीवनक्रिया पाहून मी खूपच भावूक झाले. आपण सर्वजण दिवाळी साजरी करत असताना अशा उपेक्षित लोकांची सेवा करुन त्यांना गोडधोड खायला देऊन, त्यांच्या चेह्यावरच्या आनंदाचे वर्णन करताच येत नाही शासन तर करत असतेच, परंतु समाजातील प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे अशा उपेक्षित लोकांना मदतीचा हात देऊन या लोकांच्या जीवनात आनंद वाढवाला पाहिजे..सर्वे भवन्तु सुखिनः


इतकेच नाही तर तिने एक व्हिडिओ शेअर करत अंधारात हरवलेल्यांसाठी प्रकाश व्हा म्हणत गरिबांना जेवू देखील घातले आहे. अपूर्वाच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

Web Title: 'Ratris Khel Chale' fame Shevanta alias Apoorva Nemalekar's work for the poor is being praised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.