'रामायण'मध्ये झाला रावणाचा वध, त्या जागी प्रेक्षकांच्या भेटीला येणार लव-कुश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 02:30 PM2020-04-18T14:30:05+5:302020-04-18T14:30:42+5:30

रामायण मालिकेचा शेवटचा भाग शनिवारीप्रसारित होत आहे.

Ravana was killed in the Ramayana, where the audience will come to visit the audience TJL | 'रामायण'मध्ये झाला रावणाचा वध, त्या जागी प्रेक्षकांच्या भेटीला येणार लव-कुश

'रामायण'मध्ये झाला रावणाचा वध, त्या जागी प्रेक्षकांच्या भेटीला येणार लव-कुश

googlenewsNext

देशभरात लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे सर्व जण घरात आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी रामायण प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. लोकांना रामायण खूप आवडते आहे. नुकत्याच प्रसारीत केलेल्या भागात राम रावणाचा वध करतो. त्यामुळे लोकांना वाटतेय की रामायण आता संपले आहे. मात्र रामायणचे लोकांमधील क्रेझ पाहता दूरदर्शनने लव-कुश मालिकेचे पुनःप्रसारण करायचे ठरविले आहे. 

लवकुश 1988मध्ये दूरदर्शनवर उत्तर रामायण या नावाने प्रसारीत केली होती. ही मालिकादेखील रामानंद सागर यांनी बनवली होती. लवकुशच्या प्रसारणाची माहिती प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर यांनी दिली आहे. ही मालिका १९ एप्रिल पासून रोज रात्री ९ वाजता आणि रविवारी सकाळी ९ वा प्रसारित केली जाणार आहे.


प्रसार भारतीचे सीइओ शशी शेखर म्हणाले देशात लॉक डाऊनची मुदत ३ मे पर्यंत वाढविली गेली आहे. शनिवारी रामायण मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होत आहे आणि रविवारी त्याचे रिपीट टेलिकास्ट होईल. त्यानंतर रात्री नऊ वाजता लव कुश मालिका सुरु होईल.

सोशल मीडियावर या संदर्भात माहिती दिली गेली असून ही मालिका ३९ भागांची आहे. त्यात सीता वनवासापासूनची कथा आहे. लव कुश यांची भूमिका स्वप्नील जोशी आणि मयुरेश सगदेव यांनी केली आहे. रामायण आणि महाभारत मालिकांनी टीआरपी मिळविण्याचे रेकॉर्ड केल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Ravana was killed in the Ramayana, where the audience will come to visit the audience TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ramayanरामायण