नच बलिये 9: सेटवरच ढसाढसा रडली रवीना टंडन, स्पर्धकांची मागावी लागली माफी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 16:17 IST2019-08-26T16:16:43+5:302019-08-26T16:17:47+5:30
नच बलिये 9मध्ये एक्स कपल आपल्या दमदार परफॉर्मेन्सने सगळ्यांची मनं जिंकत आहेत. गेल्या रविवारी यातील एका जोडी आऊट झाली.

नच बलिये 9: सेटवरच ढसाढसा रडली रवीना टंडन, स्पर्धकांची मागावी लागली माफी?
नच बलिये 9मध्ये एक्स कपल आपल्या दमदार परफॉर्मेन्सने सगळ्यांची मनं जिंकत आहेत. गेल्या रविवारी यातील एका जोडी आऊट झाली. शोमधून एक्स कपल उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेव आऊट झाले. एलिमिनेशन राऊंडमध्ये त्याची टक्कर मधुरिमा तुली- विशाल आदित्य सिंग यांच्यासोबत. रिझल्ट ऐकण्याच्या आधीच रवीना टंडन इमोशनल झाली.
रिजल्ट ऐकण्याआधीच अहमद खान आणि रवीना टंडन हिने बॅकस्टेज जाण्याचा निर्णय घेतला. डेंजर झोनमध्ये आलेल्या दोन्ही जोड्यांचे परफॉर्मेन्स पुन्हा एकदा बघण्याचा निर्णय अहमद खान आणि रवीनाने घेतला. ज्यानंतर जेव्हा निर्णय सांगण्याची वेळ आली तेव्हा रवीनाला अश्रू अनावर झाले. रवीनाने दोनही जोड्यांची माफी मागितली. रवीना म्हणाली, खूप कठिण निर्णय होता आमच्यासाठी. परीक्षकांनी मधुरिमा- विशालला 93.5% दिले तर उर्वशी-अनुज को 92.5% देण्यात आले. त्यामुळे उर्वशी-अनुजाच्या जोडीला शो बाहेर जावे लागले.
उर्वशीने शोच्या एलिमिनेशनवर प्रश्न उपस्थित केले तसेच शोच्या फॉर्मेटवर सुद्धा तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शोमध्ये जोड्यांना घेऊन पक्षपात करण्यात येत असल्याचा आरोप तिने लावला. याआधी ही मी अनेक रिअॅलिटी शोचा भाग बनले होते मात्र पहिल्यांदा मी पहिल्यांदा ऐवढे मतभेद पाहिले. आजतकच्या रिपोर्टनुसार नाराज झालेल्या उर्वशीला शोमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री देऊन परत आणण्याची शक्यता आहे.