'कपिल शर्मा शो'मध्ये जाणं सोनाली कुलकर्णीला पडलं महागात; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 16:43 IST2021-12-19T16:42:42+5:302021-12-19T16:43:32+5:30
Sonali kulkarni: सध्या सोशल मीडियावर या शोमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली रवि किशन यांच्यासोबत दिलेल्या इंटिमेट सीनविषयी बोलताना दिसत आहे.

'कपिल शर्मा शो'मध्ये जाणं सोनाली कुलकर्णीला पडलं महागात; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत राहणारा शो म्हणजे 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show). आतापर्यंत या शोमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. यामध्येच अलिकडे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) , रवि किशन (Ravi Kishan) आणि सचिन खेडेकर (sachin kedekar) या शोमध्ये सहभागी झाले होते. मात्र, यावेळी सोनालीने केलेल्या एका बोल्ड वक्तव्यामुळे तिच्यावर नेटकऱ्यांनी टीकास्त्र डागलं आहे.
सध्या सोशल मीडियावर या शोमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली रवि किशन यांच्यासोबत दिलेल्या इंटिमेट सीनविषयी बोलताना दिसत आहे. मात्र, यावेळी तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. इतकंच नाही तर 'खरंच हा फॅमिली शो आहे का?' असा प्रश्नही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाली सोनाली?
सोनाली एका चित्रपटातील रवि किशन यांच्यासोबत दिलेल्या इंटिमेट सीनविषयी सांगत होती. या चित्रपटात सोनालीने रवि किशन यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. "मला रवि किशन यांच्यासोबत काम करायची संधी मिळत होती. त्यावेळी श्याम बाबू यांनी मला फोन केला आणि विचारलं. 'एक रोल आहे करशील का?' त्यावर 'मी म्हटलं हो करेन'. त्यावर ते म्हणाले. 'तू पत्नी आणि रवि किशन तुझा पती असेल'. मी म्हटलं 'ठीक आहे सर, मी करेन हा रोल", असं सोनाली म्हणाली.
पुढे ती म्हणते, "यात आमचा एक इंटिमेट सीन होता. ज्यात मला रवि किशन यांच्यासोबत बेड सीन द्यायचा होता. खरं तर हा सीन ऐकून मला प्रचंड लाज वाटत होती. पण, हा सीन करताना मज्जा आली". विशेष म्हणजे सोनालीचे हे वाक्य ऐकल्यावर रवि किशन यांना अनकम्फर्टेबल वाटलं आणि लाजेने त्यांनी मान खाली घातली. त्याचसोबत सोनालीचं हे वाक्य ऐकल्यावर अनेकांनी तिला ट्रोल केलं.
काय म्हणाले ट्रोलर्स?
सोनालीचं हे वाक्य ऐकल्यावर "खरंच हा फॅमिली शो आहे का?" असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. तर "सोनाली नाही, रवि किशनच लाजेने चूरचूर झालेत", असं अन्य एका युजरने म्हटलं आहे. तसंच "अत्यंत वाईट विनोद", असंही काही जणांनी म्हटलं आहे. दरम्यान, सोनाली, रवि किशन आणि सचिन खेडेकर द कपिल शर्मा शोमध्ये 'Whistleblower' या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी आले होते.