रझा मुराद यांचा नवा लघुपट 'अंकल ऑन द रॉक्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 21:30 IST2018-11-01T21:30:00+5:302018-11-01T21:30:00+5:30

रझा मुराद 'अंकल ऑन द रॉक्स' या लघुपटात प्रियकराच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Raza Murad's new short film 'Uncle On The Rocks' | रझा मुराद यांचा नवा लघुपट 'अंकल ऑन द रॉक्स'

रझा मुराद यांचा नवा लघुपट 'अंकल ऑन द रॉक्स'

ठळक मुद्देरझा मुराद प्रियकराच्या भूमिकेत

सध्या वेगवेगळ्या वेबसीरिज व लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात आता आणखीन एक नवीन लघुपट लवकरच दाखल होत आहे. वेब सिरीज 'प्यार ऑन द रॉक्स' यशस्वी झाल्यानंतर आता रझा मुराद हा अनुभवी अभिनेता 'अंकल ऑन द रॉक्स' या लघुपटात दिसणार आहे. यामध्ये ते प्रियकराच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

'अंकल ऑन द रॉक्स' ही एका वृद्ध माणसाची विनोदी प्रेमकथा आहे. टिंडरवर आपले प्रोफाईल तयार करण्यासाठी हा म्हातारा माणूस त्याच्या भाच्याला फूस लावतो असे याचे कथानक आहे.  हा भाचा त्याचा गुरु आणि सल्लागार बनतो. रझा मुरादला टिंडरवर कोणी साथीदार सापडतो का?  रझा मुराद प्रेमात पडतो का? या नात्याला काही भविष्य असणार आहे का?  या सर्व प्रश्नांची उत्तरे या अतिशय मजेदार लघुपटात उलगडणार आहेत.
याबाबत रझा मुराद म्हणाले, 'जेव्हा मी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तेव्हापासूनच मला भावनाप्रधान प्रियकराची भूमिका साकारण्याची इच्छा होती.  गंमत म्हणजे माझ्या 48 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत मला अशी भूमिका साकारण्याची संधी कधीही मिळाली नाही. जेव्हा मी याचे कथानक वाचले, तेव्हाच मला जाणीव झाली की ही भूमिका माझ्यासाठी एक आव्हान असणार आहे कारण या लघुपटात मी प्रथमच प्रियकराची भूमिका साकारणार आहे.'   
ते पुढे म्हणाले, 'डिजिटल प्लॅटफॉर्मवर माझा हा दुसरा लघुपट आहे. अशा लघुपटातील भूमिका मला एक वेगळा अनुभव देऊन जातात.  यामध्ये नवे कथानक आणि कल्पना आहेत आणि माझ्यातील कलाकाराची एक प्रेमळ बाजू दाखविण्याची संधी मला या लघुपटामुळे मिळणार आहे.'

Web Title: Raza Murad's new short film 'Uncle On The Rocks'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.