'बाजीराव मस्तानी'मध्ये रझा मुराद यांची एंट्री !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2016 11:30 AM2016-10-20T11:30:22+5:302016-10-20T11:38:48+5:30

'बाजीराव मस्तानी' ही ऐतिहासिक मालिका लवकरच छोट्या पडद्यावरील रसिकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत आता ज्येष्ठ अभिनेता रझा मुराद ...

Razza Murad's entry in Bajirao Mastani! | 'बाजीराव मस्तानी'मध्ये रझा मुराद यांची एंट्री !

'बाजीराव मस्तानी'मध्ये रझा मुराद यांची एंट्री !

googlenewsNext
'
;बाजीराव मस्तानी' ही ऐतिहासिक मालिका लवकरच छोट्या पडद्यावरील रसिकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत आता ज्येष्ठ अभिनेता रझा मुराद यांची निवड झाली आहे. रझा मुराद बाजीराव मस्तानी या मालिकेत औरंगजेबाची भूमिका साकारताना पाहायला मिळतील. 200 हून अधिक सिनेमात काम केलेल्या रझा मुराद यांनी याआधी 'शुभ दिन आयो' या मालिकेत अकबर, संजय खान यांच्या 1857 या सिनेमात जहाँगीर अशा व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. विशेष म्हणजे संजय लीला भन्साली यांच्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही रझा मुराद यांनी भूमिका साकारली होती.आता नव्या आव्हानांसह औरंगजेब ही भूमिका साकारण्यासाठी रझा मुराद सज्ज आहेत. या मालिकेत रझा मुराद यांच्यासह मृणाल कुलकर्णी,अनुजा साठे,मनीष वाधवा,संजय बद्रा,रुद्र सोनी,नवाब शहा आदी कलाकार झळकणार आहेत. याविषयी रझा मुराद सांगतात की, छोट्या पडद्यावर औरंगजेबची भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे.अनुभवी कलाकरांची फौज मालिकेत असल्यामुळे या सगळ्यांसह काम करण्यात खूप मजा येईल.पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला येणार असल्यामुळे रसिकांनी ज्याप्रमाणे आधी माझ्यावर प्रेम केले आहे, तसेच प्रेम असूद्या.असा संदेशही रझा मुराद यांनी त्यांच्या चाहत्यांना दिला आहे. रुपेरी पडद्यावर 'बाजीराव मस्तानी' सिनेमाने अमाप लोकप्रियता मिळवली होती. या सिनेमातही रझा मुराद यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. गेल्याच वर्षी बाजीराव मस्तानी सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता बाजीराव मस्तानीची प्रेमकथा  छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.बाजीराव मस्तानी पुन्हा एकदा अनुभवणे हा रसिकांसाठी एक अनोखा अनुभव असणार आहे.  

Web Title: Razza Murad's entry in Bajirao Mastani!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.