या कारणामुळे आदिती गुप्ताने सोडली परदेस में है मेरा दिल ही मालिका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2017 11:56 AM2017-03-06T11:56:10+5:302017-03-06T17:26:10+5:30
परदेस में है मेरा दिल ही मालिका आणि या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूपच आवडतात. या मालिकेत आदिती गुप्ता ...
प देस में है मेरा दिल ही मालिका आणि या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूपच आवडतात. या मालिकेत आदिती गुप्ता प्रेक्षकांना संजना या ग्लॅमरस भूमिकेत पाहायला मिळत आहे. पण आता आदितीने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही मालिका आता लवकरच लीप घेणार असून या मालिकेचे कथानक काही काळ पुढे जाणार आहे आणि त्यानंतर या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या राघवच्या व्यक्तिरेखेत अनेक बदल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. राघवची भूमिका काहीशी नकारात्मक होणार असून या मालिकेत आता राघवची भूमिका साकारणारा अर्जुन बिजलानी खलनायकाची भूमिका साकारणार आहे. तसेच या मालिकेत काहीच दिवसांपूर्वी अदा खान आणि विनित रैना यांची एंट्री झाली आहे. या दोघांच्या एंट्रीनंतर मालिकेच्या कथानकाला खूप वळणं मिळाली आहेत. या मालिकेत सध्या अदा प्रेक्षकांना अर्जुन बिजलानी आणि लक्ष लालवाणी यांच्या प्रेयसीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
आदितीची भूमिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड प्रसिद्ध असली तरी तिने या मालिकेला रामराम ठोकला आहे. याविषयी आदिती सांगते, "ही मालिका सोडण्याचा निर्णय हा माझा वैयक्तिक आहे. पुढील भागांमध्ये माझ्या व्यक्तिरेखेला जे वळण देण्यात येणार आहे ते मला आवडलेले नसल्याने मी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत काम करण्याचा माझा अनुभव खूपच चांगला होता. या मालिकेतील टीम ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे होती. मी ही मालिका सोडल्यानंतर सगळ्यांना मिस करणार आहे. या मालिकेच्या सगळ्या टीमला माझ्याकडून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा."