​या कारणामुळे हर्षदा खानविलकरच्या आईने तिच्यासोबत धरला होता अबोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 11:43 AM2018-05-18T11:43:45+5:302018-05-18T17:13:45+5:30

हर्षदा खानविलकरने आभाळमाया, पुढचे पाऊल यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मराठीप्रमाणेच तिने हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले ...

For this reason, Harbha Khanvilkar's mother had taken her along with Abola | ​या कारणामुळे हर्षदा खानविलकरच्या आईने तिच्यासोबत धरला होता अबोला

​या कारणामुळे हर्षदा खानविलकरच्या आईने तिच्यासोबत धरला होता अबोला

googlenewsNext
्षदा खानविलकरने आभाळमाया, पुढचे पाऊल यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मराठीप्रमाणेच तिने हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. अस्तित्व एक प्रेमकहाणी या मालिकेतील तिच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले होते. हर्षदा ही एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक निर्माती आणि कॉश्च्युम डिझायनर आहे. हर्षदाचा नुकताच बिग बॉस मराठी या कार्यक्रमात प्रवेश झाला असून हर्षदाच्या एंट्रीने मालिकेच्या टीआरपीत चांगलाच फरक पडेल अशी कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. 
पुढचे पाऊल या मालिकेमुळे हर्षदाला आज सगळेजण अक्कासाहेब म्हणूनच ओळखतात. हर्षदाचा अभिनय प्रवास हा खूपच रंजक आहे. हर्षदाच्या कुटुंबियाच्या ओळखीतील एका व्यक्तीने तिचे काही फोटो काढले होते. त्यातील एक फोटो एका मॅगझिनच्या कव्हरवर झळकला होता. हा फोटो पाहून त्या काळातील हिंदी मालिकांमधील आघाडीच्या निर्मात्या नीना गुप्ता यांनी हर्षदाला फोन करून दर्द या मालिकेत काम करण्याविषयी विचारले होते. नीना यांनी हर्षदाशी संपर्क कसा साधला याचा देखील एक किस्सा आहे. हर्षदाच्या घरात त्यावेळी फोन नव्हता. त्यामुळे नीना यांनी हर्षदाच्या शेजाऱ्याच्या घरात हर्षदासाठी फोन केला होता. हर्षदाने नीना यांचा आवाज ऐकताच तिला आश्चर्याचा धक्का बसला आणि तिने फोनच कट केला. त्यानंतर काही मिनिटांनी नीना यांनी हर्षदाला पुन्हा फोन केला आणि भेटायला बोलावले. हर्षदा तिच्या वडिलांसोबत नीना यांना भेटायला गेली. तिथे गेल्यावर नीना यांनी हर्षदाला काही संवाद म्हणायला सांगितले आणि पहिल्याच भेटीत त्यांच्या दर्द या मालिकेत त्यांनी हर्षदाला काम करण्याची संधी दिली. त्यावेळी हर्षदा लॉ कॉलेजमध्ये शिकत होती. चित्रीकरणामुळे तिला कॉलेजमध्ये उपस्थिती लावणे शक्य नव्हते. वर्षभर तरी हर्षदा कॉलेजला गेलीच नाही. त्यामुळे तिला कॉलेजमधून काढण्यात आले. हर्षदाने अशाप्रकारे अर्धवट शिक्षण सोडणे हर्षदाच्या आईला अजिबात आवडले नव्हते. हर्षदाने शिक्षण सोडून अभिनयाचा मार्ग निवडल्यामुळे तिची आई तिच्याशी कित्येक दिवस बोलत नव्हती. पण तिच्या वडिलांनी तिला नेहमीच या क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. 

Also Read : ​या अभिनेत्रीवर होते अस्ताद काळेचे जीवापाड प्रेम... कॅन्सरने झाले होते या अभिनेत्रीचे निधन

Web Title: For this reason, Harbha Khanvilkar's mother had taken her along with Abola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.