या कारणामुळे कपिल देव 'डान्स प्लस'च्या मंचावर झाले हळवे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 08:30 PM2018-11-29T20:30:00+5:302018-11-29T20:30:00+5:30

स्टार प्लसवरील डान्स रिअॅलिटी शो डान्स+ ४ मध्ये भारतीय क्रिकेटपटू कपिल देवने हजेरी लावली होती.

For this reason, Kapil Dev is emotional on the stage of 'Dance Plus' | या कारणामुळे कपिल देव 'डान्स प्लस'च्या मंचावर झाले हळवे

या कारणामुळे कपिल देव 'डान्स प्लस'च्या मंचावर झाले हळवे

googlenewsNext

 भारतीय क्रिकेटपटू कपिल देव स्टार प्लसवरील डान्स रिअॅलिटी शो डान्स+ ४ मध्ये ‘कलर्स ऑफ इंडिया’ ह्या संकल्पनेचा हिस्सा म्हणून आले होते आणि त्यांना ह्या शोमध्ये अनपेक्षित सरप्राईज अनुभवायला मिळाले. ह्या शोमधील अख्ख्या टीमने त्यांच्या लहानपणापासून १९८३चा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकण्यापर्यंतचा त्यांचा आयुष्य प्रवास रेखाटला आणि त्यामुळे कपिल देव
खूपच हळवे झाले.


आपल्या खिलाडू वृत्तीने ह्या दिग्गज क्रिकेटपटूने आपल्याला नेहमीच प्रभावित केले आहे. त्यामुळे डान्स+ च्या टीमने डान्सच्या माध्यमातून त्यांचे यश आपल्या अॅक्टमध्ये रेखाटून त्यांना आदरांजली देण्याचे ठरवले. त्यांच्या ह्या प्रेमाने कपिल देव खूप भावूक झाले आणि त्यांनी जणू आपले आयुष्य पुन्हा एकदा जगले. ते मंचावर गेले आणि आजपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या हृदयावर कोरल्या गेलेल्या त्या क्षणांबद्दलच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.
तो ऐतिहासिक क्षण त्यांनी स्पर्धकांसोबत साकारला. ते म्हणाले, “ह्या स्पर्धकांनी ज्या पद्धतीने १९८३ च्या वर्ल्ड कपचा क्षण पुन्हा निर्माण केला, त्यावरून त्या महत्त्वपूर्ण मॅचनंतर जेव्हा माझ्या हातात मी तो चषक पकडला होता, तो क्षण माझ्यासमोर उभा राहिला. मी अतिशय हळवा झालो आहे. कारण ते क्षण मी पुन्हा एकदा जगलो. मला एवढे प्रेम दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.”
ते पुढे असेही म्हणाले, “एखाद्या गोष्टीवरील उत्कट प्रेमच आपल्याला आपली स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करतात. मी लहान असताना मला केवळ खेळायचे आहे हे मला ठाऊक होते. क्रिकेटवर प्रेम होतेच. ह्या स्पर्धकांना पाहिल्यानंतर मला माझ्या
तरूणपणीचे दिवस आठवले आणि मी हेच सांगू इच्छितो की आपले पॅशन जिवंत ठेवा आणि स्वतःशी स्पर्धा करा. तुम्हाला यश नक्की मिळेल.”
 

Web Title: For this reason, Kapil Dev is emotional on the stage of 'Dance Plus'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.