या कारणामुळे ​मोहित मलिकला कुल्फीकुमार बाजेवाला या मालिकेच्या सेटवर अश्रू झाले अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 07:11 AM2018-03-28T07:11:44+5:302018-03-28T12:41:44+5:30

कोण म्हणतं की अभिनेता असणं म्हणजे केवळ ग्लॅमरस आणि सर्व ऐशोरामाचे जीवन जगायला मिळतं! काही अभिनेते आपल्या व्यक्तिरेखेत इतके ...

For this reason, Mohit Malik got tired of the series set by Kulfikumar Bazwala | या कारणामुळे ​मोहित मलिकला कुल्फीकुमार बाजेवाला या मालिकेच्या सेटवर अश्रू झाले अनावर

या कारणामुळे ​मोहित मलिकला कुल्फीकुमार बाजेवाला या मालिकेच्या सेटवर अश्रू झाले अनावर

googlenewsNext
ण म्हणतं की अभिनेता असणं म्हणजे केवळ ग्लॅमरस आणि सर्व ऐशोरामाचे जीवन जगायला मिळतं! काही अभिनेते आपल्या व्यक्तिरेखेत इतके गुंतून जातात की त्याचा विपरित परिणाम त्यांच्या वैयक्तिक जीवनावरही होऊ लागतो. ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत सिकंदरसिंह गिल या रॉकस्टारची भूमिका रंगवणाऱ्या मोहित मलिक याच्याबाबत असेच काहीसे घडले आणि अलीकडेच एका प्रसंगाचे चित्रीकरण केल्यावर त्याला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत आणि तो सेटवरच ओक्साबोक्शी रडायला लागला.
तब्बल तीन वर्षांनंतर मोहित मलिक टीव्ही मालिकांमध्ये पुनरागमन करत असून ‘स्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत तो सिकंदरसिंह गिल या विलक्षण लोकप्रिय रॉकस्टारची भूमिका रंगवत आहे. अलीकडेच मालिकेतील एक अतिशय गंभीर आणि भावनाप्रधान प्रसंगाचे चित्रीकरण पार पडल्यानंतर मोहित या प्रसंगात इतका गुंतून गेला होता की, आपल्याशी पुढील तीन तास कोणीही संपर्क साधू नये, अशी सूचना त्याने सेटवरील सहकलाकार आणि कर्मचाऱ्यांना केली. या घटनेबद्दल त्याच्याकडे विचारणा केली असता मोहित सांगतो, आजपर्यंत मी विविध मालिकांमध्ये वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारे प्रसंग चित्रीत केले आहेत. परंतु या मालिकेत मी नुकताच जो प्रसंग चित्रीत केला, त्याचा सखोल परिणाम माझ्या मनावर झाला असून या प्रसंगाच्या अखेरीस मला माझ्या भावना नियंत्रणात ठेवता आल्या नाहीत. त्यानंतर लगेचच दुसऱ्या प्रसंगाचे चित्रीकरण करण्यासारखी माझी मानसिक अवस्था नव्हती. म्हणूनच मी मला कोणीही भेटू नये, अशी विनंती केली होती. माझ्या मनावर सिकंदर या व्यक्तिरेखेइतका प्रभाव अन्य कोणत्याच भूमिकेने टाकलेला नाही. मला ही भूमिका रंगविण्यास मिळाली, याबद्दल मी स्वत:ला सुदैवी समजतो.”
या मालिकेत पठाणकोटजवळील मत्सुआ गावातील एका सात वर्षांच्या मुलीची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत असून या कुल्फीला अत्यंत सुरेल आणि गोड गळ्याची तिला देणगी लाभलेली आहे. कुल्फी ही आपल्या गोड आवाजाने निराश किंवा दु:खी प्रसंगाचे रूपांतर नेहमीच आनंद आणि सकारात्मक वातावरणात करते. कुल्फी ही अतिशय आनंदी, स्वच्छंदी, मिश्किल आणि निरागस स्वभावाची, सदा हसतमुख असणारी मुलगी आहे. आपल्या आवडत्या सलवार-कुर्ता, स्पोर्टस शूज आणि केसांची छानशी बांधलेली पोनी टेल अशा अवतारात कुल्फी आपल्या गावातील गल्लीबोळांतून नव्या गोष्टींचा शोध घेत फिरताना दिसते.

Also Read : नक्कश अझीझ कुल्फीकुमार बाजेवाला या मालिकेसाठी करणार गायन

Web Title: For this reason, Mohit Malik got tired of the series set by Kulfikumar Bazwala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.