या कारणामुळेच मिळाली होती रिद्धीमाला 'रजनी द रोबोची' भूमिका? जाणून घ्या कोणते होते ते कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2016 01:21 PM2016-12-16T13:21:38+5:302016-12-16T13:22:20+5:30
कलाकारांनाही त्यांच्या आवडत्या कलाकरांची नक्कल करायला आवडते. म्हणून इतर कार्यक्रम असो किंवा मग त्यांच्या मालिकेच्या सेटवर आपल्या आवडत्या कलाकारांची ...
क ाकारांनाही त्यांच्या आवडत्या कलाकरांची नक्कल करायला आवडते. म्हणून इतर कार्यक्रम असो किंवा मग त्यांच्या मालिकेच्या सेटवर आपल्या आवडत्या कलाकारांची नक्कल करत त्यांच्या सहकलाकारांचे मनोरंजन करताना दिसतात.असाच काहीसा किस्सा आहे 'बहु हमारी रनजी-कांत' मालिकेच्या सेटवर.'रजनी द रोबोट'ची भूमिका साकारणारी रिद्धीमा पंडित हुबेहुबे बॉलिवूड कलाकारांची उत्कृष्ट नक्कल करते.विशेष म्हणजे तिच्या उत्तम नक्कल करण्याच्या कौशल्यामुळेच तिला या मालिकेत रोबोटची मुख्य भूमिका मिळालीय. जेव्हा सेटवर शूटिंगमधून रिद्धीमाला वेळ मिळतो.तेव्हा रिद्धीमा रेखा, हेमामालिनी आणि श्रीदेवी यांच्या नक्कल करत फुल ऑन मनोंरजन करत असल्याचे तिचे सहकलाकार सागंतात.
लहानपणापासूनच मला नक्कल करायला आवडते. माझ्या कुटुंबात होणा-या कार्यक्रमात मी नेहमी आमच्या कुटुंबाच्या सदस्याची किंवा मग बॉलिवूड कलाकारांच्या हुबेहुबे नक्कल करून दाखवायचे. माझ्या नक्कल करण्याच्या कौशल्यामुळे माझ्या कुटुंबाची आणि मित्रमंडळींचे चांगले मनोरंजन व्हायचे.एखाद्या कलाकाराची नक्कल करणे म्हणजे त्या कलाकाराची स्तुती करण्यासारखे असते. त्यामुळे जेव्हा मी माझ्या चाहत्यांना माझ्या भूमिकेची नक्कल करताना पाहते तेव्हा मला खूप आनंद होत असल्याचे रिद्धीमा सांगते.यामुळे रसिकांना 'रजनी द रोबोटची' ही भूमिका आवडतेय हे कळते. जेव्हा जेव्हा मला माझ्या चाहत्यांना भेटण्याची संधी मिळते तेव्हा ते माझ्या भूमिकेचे विशेष कौतुक करतात. एक कलाकार म्हणून जेव्हा त्याच्या कलागुणांची पोचपावती थेट त्याच्या चाहत्यांकडून मिळते तेव्हा खूप आनंद होतो. इतर कलाकारांप्रमाणेच माझे ही कलाकार बनण्याचे स्वप्न होते त्यामुळे आज चाहत्यांच्या कौतुक पाहून ख-या अर्थाने माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते. माझ्या करिअरमधला पहिला टप्पा मी यशस्वीरित्या पार केल्याची जाणीव होत असल्याचे रिद्धीमाने सांगितले.