या कारणामुळे सारा खानला खावी लागली होती पाकिस्तानमध्ये जेलची हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2017 09:07 AM2017-04-07T09:07:14+5:302017-04-07T14:37:14+5:30

सपना बाबुल का बिदाई या मालिकेद्वारे सारा खानने छोट्या पडद्यावर एंट्री केली. तिने या मालिकेत साकारलेली भूमिका प्रचंड गाजली ...

For this reason, Sara Khan had to eat in Pakistan | या कारणामुळे सारा खानला खावी लागली होती पाकिस्तानमध्ये जेलची हवा

या कारणामुळे सारा खानला खावी लागली होती पाकिस्तानमध्ये जेलची हवा

googlenewsNext
ना बाबुल का बिदाई या मालिकेद्वारे सारा खानने छोट्या पडद्यावर एंट्री केली. तिने या मालिकेत साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. यानंतर ती ससुराल सिमर का, राम मिलाये जोडी यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. बिग बॉस या कार्यक्रमातदेखील स्पर्धक म्हणून आपल्याला साराला पाहायला मिळाले होते. साराने बिग बॉसच्या घरात असताना अली मर्चंट या तिच्या प्रियकरासोबत लग्नदेखील केले होते. पण हे लग्न केवळ काही दिवसांसाठी टिकले. सारा ही भारतीय टेलिव्हिजनवरची एक प्रसिद्ध अभिनेत्री असण्यासोबतच पाकिस्तानमध्येदेखील तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ती पाकिस्तानमध्येच आहे. पाकिस्तानचा या वेळेचा दौरा तिला चांगलाच महागात पडला असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानमध्ये तिला जेलची हवा खायला लागली असल्याचे म्हटले जात आहे. 
पाकिस्तानमध्ये सारा चित्रीकरणासाठी गेली असता तिने व्हिजाच्या काही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तिला जेलमध्ये जावे लागले होते असा एका वेवबाइटने दावा केला आहे. योग्य व्हिजा नसताना भारतात येण्याचा ती प्रयत्न करत असताना तिला विमानतळावर अडवण्यात आले होते आणि त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली होती असे या वेबसाइटने म्हटले आहे. पण या सगळ्या गोष्टी चुकीच्या असल्याचे साराने म्हटले आहे. साराने म्हटले आहे की, मला विमानतळावर थांबवण्यात आले हे खरे आहे. माझा व्हिजा पाहण्यासाठी मला काही वेळासाठी थांबवण्यात आले होते. पण मला कोणीही अटक केले नाही की मला जेलमध्ये जावे लागले नाही. त्यामुळे या अफवा कोण पसरवत आहेत हेच मला कळत नाही. 

Web Title: For this reason, Sara Khan had to eat in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.