इंडस्ट्रीपासून दूर जात शेती करतोय हा प्रसिद्ध अभिनेता,स्मार्ट विलेज बनवण्याचे स्वप्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 07:00 AM2021-08-11T07:00:00+5:302021-08-11T07:00:00+5:30
राजेश कुमार 'सारा भाई व्हर्सेस साराभाई' या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रिय झला होता.'बा बहू बेबी', टेक 2', 'खिचड़ी' 'शरारत' आणि 'एक्सक्यूज मी मै़डम' मालिकेतही तो झळकला आहे.
नोकरी धंद्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकजण नोकरी तसंच कामाच्या शोधात गावातून शहरात येतात. मात्र शहरातली कामाचं तसंच पैसे कमावण्याचं चांगलं साधन सोडून कुणी गावात जाणारा व्यक्ती अपवादानंच पाहायला मिळतो. त्यातच एखादा व्यक्ती जो कायम ग्लॅमरच्या दुनियेत असतो त्याने काही हटके गोष्ट केली तर चर्चा तर होणारच. आजवर कलाकार मंडळी राजकारण किंवा स्वतःचा व्यवसाय सांभाळताना आपण पाहिलंय. मात्र एका कलाकाराने अभिनय सोडून चक्क काळ्या मातीची सेवा करण्याचे ठरवलं आणि ते यशस्वीरित्या करूनही दाखवलंय. या कलाकाराचे नाव आहे अभिनेता राजेश कुमार.
राजेश कुमार सध्या मुंबई सोडून आपल्या गावी कुटुंबासह राहत आहे. आपल्या गावी आता तो सध्या शेती करण्यात बिझी झाला आहे. आपल्या शेतात तो नैसर्गिक पद्धतीने विविध पिके घेतो. अनोख्या पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने शेती करत असल्याचे समोर आल्याने चाहते आणि मित्रांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अनेक कलाकारांनी राजेशचे कौतुकही केले आहे.
बिहारमध्ये राजेशचे बर्मा गाव आहे. या गावाल स्मार्ट विलेज बनवण्याचे त्याचे स्वप्न आहे.एका दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, एक दिवशी झाडा खाली विश्रांतीसाठी बसलो होतो. त्याचवेळी आपल्या गावाने स्मार्ट विलेज बनावे असा विचार मनात आला. गावात आजही मुलभूत सुविधांचा अभाव आहे. विज आणि पाण्याची समस्या आजीह गावात आहे. स्मार्ट विलेज कसे बनवले जाईल यासाठी स्थानिक अधिका-यांनाही भेटलो, त्यानुसार प्रयत्नही सुरु केले आता हळूहळू गावाची परिस्थिती सुधारत असल्याचे राजेशने सांगितले.
१९९८ मध्ये राजेश मुंबईत आपल्या बहिणीकडे आला होता. ग्रेजुएशन बिहार यूनिवर्सिटी पूर्ण केले आहे.एका मित्राने त्याला एक छोटासा रोल ऑफर केला. रोलनुसार त्याला फक्त "हैप्पी एनिवर्सरी कांग्रेचुलेशन... ये रही आपकी टिकट", इतकाच डॉयलॉग बोलायचा होता.
इतक्या छोट्या डायलॉगसाठीही त्याला २द रिटेक घ्यावे लागले होते.या भूमिकेसाठी त्याला १००० रु इतके मानधन मिळाले होते. राजेश 'सारा भाई व्हर्सेस साराभाई' या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रिय झला होता.'बा बहू बेबी', टेक 2', 'खिचड़ी' 'शरारत' आणि 'एक्सक्यूज मी मै़डम' मालिकेतही तो झळकला आहे.