Bigg Boss Marathi : या कारणामुळे मेघा धाडे दीड वर्षं घराबाहेरच पडली नव्हती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:13 PM2018-07-27T13:13:21+5:302018-07-27T15:07:05+5:30
बिग बॉस मराठी या कार्यक्रमामुळे मेघा धाडेचे नाव घराघरात पोहोचले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, बिग बॉस मराठीच्या घरात येण्याआधी मेघाचा एक अपघात झाला होता आणि त्यामुळे ती चित्रपटसृष्टीपासून दूर होती. या अपघातामुळे ती अनेक दिवस घरीच होती.
बिग बॉस मराठी या कार्यक्रमामुळे मेघा धाडेला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच तिला बिग बॉस मराठीच्या विजेतेपदाचे एक प्रबळ दावेदार मानले जात होते. तिने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकले. आज बिग बॉस मराठी या कार्यक्रमामुळे मेघा धाडेचे नाव घराघरात पोहोचले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, बिग बॉस मराठीच्या घरात येण्याआधी मेघाचा एक अपघात झाला होता आणि त्यामुळे ती चित्रपटसृष्टीपासून दूर होती. या अपघातामुळे ती अनेक दिवस घरीच होती.
मेघा धाडेचा दीड वर्षांपूर्वी एक मोठा अपघात झाला होता. ती एका रिसोर्टला फिरायला गेली होती. तिथे फिरत असताना अचानक ती पडली होती. त्यावेळी तिचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते. दोन्ही पाय फ्रॅक्चर असल्याने मेघाला घराच्या बाहेर पडणे देखील शक्य नव्हते. त्यामुळे ती चित्रपटसृष्टीपासून दीड वर्षं तरी दूर होती. ती या सगळ्यातून बरी होत असतानाच तिला बिग बॉस या कार्यक्रमाची ऑफर मिळाली आणि तिने या कार्यक्रमाद्वारे कमबॅक करण्याचा निर्णय घेतला.
स्मिता गोंदकर, पुष्कर जोग, सई लोकूर, आस्ताद काळे यांना मात देत मेघा धाडेने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. बिग बॉस च्या १०० दिवसांच्या वास्तव्यात मेघावर अनेक आरोप झालेत. ती बडबडी आहे, ती खोटारडी आहे, ती अप्रामाणिक आहे, असे अनेक आरोप तिने झेलले. सई आणि पुष्कर या ‘बिग बॉस’च्या घरातील तिच्या सर्वाधिक जवळच्या मित्रांनीही तिच्यावर हे आरोप केले. पण मेघा या आरोपांना पुरून उरली. मेघा, तू ‘बिग बॉस’च्या घरात ‘जान’ आणलीस, हे महेश मांजरेकर यांचे शब्द तिने अक्षरश: खरे ठरवलेत आणि सरतेशेवटी पुष्कर जोग, रेशम टिपणीस, आस्ताद काळे सारख्या दावेदारांना बाजूला सारत ‘बिग बॉस’ची ट्रॉफी आपल्या नावावर केली.
बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर मेघाला १८ लाख ६० हजार इतकी धनराशी मिळाली आणि खोपोली येथे Nirvana Leisure Realty सिटी ऑफ म्युझिक कडून एक घर देण्यात आले.