बापरे! दीड मिनिटांच्या प्रोमो अन् १० कोटी रुपये; 'या' मालिकेसाठी रेखाने घेतलं तगडं मानधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 16:10 IST2023-06-19T16:09:31+5:302023-06-19T16:10:20+5:30
Rekha: रेखा लववकरच छोट्या पडद्यावर झळकणार आहे.

बापरे! दीड मिनिटांच्या प्रोमो अन् १० कोटी रुपये; 'या' मालिकेसाठी रेखाने घेतलं तगडं मानधन
आपल्या सदाबहार सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेखा (rekha). गेल्या काही काळापासून रेखाचा कलाविश्वातील वावर कमी झाला होता. मात्र, बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा ती तिच्या अभिनयाची जादू दाखवण्यास सज्ज झाली आहे. छोट्या पडद्यावरील गुम हैं किसी के प्यार में या मालिकेतून त्या छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. विशेष म्हणजे या मालिकेच्या एका प्रोमोसाठी त्यांनी तगडं मानधन घेतलं आहे.
काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल झाला. या प्रोमोमध्ये रेखा दिसून येत आहेत. केवळ दीड मिनिटांचा हा प्रोमो असून या प्रोमोसाठी रेखाने प्रचंड बक्कळ मानधन घेतलं आहे. 'गुम हैं किसी के प्यार में' या मालिकेत विराट आणि सईचा ट्रॅक संपणार असून मालिका 20 वर्षांचा लीप घेणार आहे. त्यामुळे मालिकेतील नव्या कलाकारांची ओळख करुन देण्यासाठी रेखा या मालिकेत दिसणार आहे.
दरम्यान, यापूर्वीही या मालिकेच्या प्रोमोमध्ये रेखा झळकली होती. 2020 मधील एका भागात ती दिसली होती. त्या भागासाठी तिने पाच-सात कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर आता रेखाच्या मानधनाचा आकडा वाढला असून यावेळी तिने १० कोटी रुपये घेतले आहेत.