VIDEO : रेखा छोट्या पडद्यावर चालवणार आपल्या अदांची जादू, 'या' खास अंदाजात करणार डेब्यू...
By अमित इंगोले | Updated: October 1, 2020 12:26 IST2020-10-01T12:23:05+5:302020-10-01T12:26:41+5:30
रेखाचे फॅन्स तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट बघत आहेत. अशातच रेखाच्या चाहत्यांसाठी एका दिलासा देणार बातमी समोर आली. रेखा लवकरच छोट्या पडद्यावर डेब्यू करणार आहे.

VIDEO : रेखा छोट्या पडद्यावर चालवणार आपल्या अदांची जादू, 'या' खास अंदाजात करणार डेब्यू...
रेखाबॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांची एक झलक बघण्यासाठी फॅन्स आतुर झालेले असतात. रेखाने भलेही सिनेमात काम करणं बंद केलं असेल, पण तिच्या चाहत्यांमध्ये जराही कमतरता आलेली नाही. हेच कारण आहे की, तिचे फॅन्स तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट बघत आहेत. अशातच रेखाच्या चाहत्यांसाठी एका दिलासा देणार बातमी समोर आली. रेखा लवकरच छोट्या पडद्यावर डेब्यू करणार आहे.
अनेक बॉलिवूड स्टार आधीच टेलिव्हिजनवर आपली कमाल दाखवून चुकले आहेत. आता रेखा आपल्या अदांची जादू छोट्या पडद्यावरही चालवणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखा स्टार प्लस वाहिनीवरील मालिका 'गुम है किसीके प्यार में' चा भाग असणार आहे.
काही दिवसांपूर्वीच स्टार प्लस चॅनलने रेखाच्या शो चा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत रेखा नेहमीप्रमाणे आपल्या दिलखश अदांजात गुम है किसीके प्यार मे गाण्याचे बोल गाताना दिसत आहे. व्हिडीओत रेखा नेहमीप्रमाणे आकर्षक आणि फ्रेश वाटत आहे. रेखाच्या या शोचा प्रोमो समोर येताच रेखाचे फॅन्स आनंदात आहेत. पण अजून रेखाने या शोचा ती कशाप्रकारे असणार आहे हे स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे आता ही मालिका आल्यावरच ते कळेल. पण रेखा बऱ्याच दिवसांनी स्क्रीनवर दिसल्याने अनेकांना हायसं झालं आहे.