सोनपरी मधली 'फ्रुटी' आठवतेय? आता दिसतेय अशी की ओळखताच येणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 19:02 IST2024-03-14T19:00:06+5:302024-03-14T19:02:14+5:30
सोनपरी या मालिकेतील सर्वांची लाडकी फ्रुटी आता दिसते अशी. सध्या काय करते ती? जाणून घ्या सविस्तर

सोनपरी मधली 'फ्रुटी' आठवतेय? आता दिसतेय अशी की ओळखताच येणार नाही!
मित्र - मैत्रिणींनो! कसंय.. आता उन्हाळी सुट्टी सुरु होतील. अर्थात जे शाळा - कॉलेजमध्ये आहेत त्यांनाच हे लागू पडतं. बाकी नोकरी करणाऱ्या माणसांना मात्र कोणतीच सुट्टी लागू होत नाही. असो! विषय भरकटतोय.. मुद्दा असा आहे की.. उन्हाळी सुट्टीमध्ये एक मालिका हमखास पाहण्यात यायची. किंबहूना पोरं वर्षभर अभ्यास सांभाळून किंवा बाजूला ठेवून ती मालिका पाहायचे. मालिकेचं नाव 'सोनपरी'. 'सोनपरी' मालिकेतील सर्वांची लाडकी फ्रुटी आता काय करतेय? आणि कशी दिसते? जाणून घ्या.
फ्रूटीची भूमिका अभिनेत्री तन्वी हेगडेने साकारली होती. तर सोनपरीच्या भूमिकेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी झळकल्या होत्या. 2000 ते 2004 या कालावधीत प्रसारित झालेल्या 'सोनपरी' मध्ये अशोक लोखंडे उर्फ अल्टू यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तन्वी आता मोठी झाली असून तुम्ही तिला ओळखूच शकणार नाही. तन्वी सोशल मीडियावर इतकी सक्रीय नसली तरीही तिच्या फॅन पेजेसवर नजर मारल्यास ती आता कशी दिसते याचा अंदाज बांधता येईल.
तन्वी शेवटची 2021 मध्ये 'अलिप्त' या सिनेमात दिसलेली. त्याआधी 2019 मध्ये ती 'शिवा' या मराठी सिनेमात दिसलेली, तिचा शो 'सोनपरी' हा 2000 च्या सुरुवातीपासूनच लोकप्रिय शोपैकी एक होता. 90 च्या दशकातील मुलांमध्ये या शोची खुप क्रेझ होती. 'सोन परी'मध्ये तन्वी हेगडे, मृणाल कुलकर्णी, अशोक लोखंडे, विवेक मुशरन आणि शशिकला यांच्या प्रमुख भूमिका होत्या.