'अॅक्शन का स्कुल टाईम' जाहिरातीतील शूजवाला मुलगा आता बनलाय मोठा माणूस, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 19:00 IST2019-11-10T19:00:00+5:302019-11-10T19:00:00+5:30
अॅक्शन शूजच्या जाहिरातीमधला कुरळ्या केसांचा छोटा मुलगा आठवत असेल ना.

'अॅक्शन का स्कुल टाईम' जाहिरातीतील शूजवाला मुलगा आता बनलाय मोठा माणूस, वाचा सविस्तर
नव्वदच्या दशकातील अनेक जाहिराती आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत. निरमा, फेविकॉल, मॅगी अशाप्रकारच्या जुन्या जाहिरातींचे मनात वेगळेच स्थान आहे. त्या जाहिरातींसोबत त्यांचे जिंगल्स सुद्धा प्रत्येकाच्या तोंडपाठ होते. त्याच जाहिरातींमधील एक जाहिरात तुम्हांला आठवत असेल. ती म्हणजे अॅक्शन शूजची जाहिरात.
आठवला का तो कुरळ्या केसांचा छोटा मुलगा. ‘ओ हो हो स्कुल टाईम, ऍक्शनचा स्कुल टाईम, क्लासवर्क, होमवर्क, पनिशमेंट अँड लेक्चर. गुड …गुड मॉर्निग टीचर.’ हे गाणं ऐकूनच तुमच्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या असतील. कुरळ्या केसाचा मुलगा आपल्याला जाहिरातीत त्याचे चकचकणारे शूज दाखवायचा आणि आपणही आई वडिलांकडे तसेच शूज हवे असल्याचा हट्ट करत होतो.
हा मुलगा आता मोठा झाला असून त्याचे नाव आहे तेजन दिवानजी. तेजनने त्यावेळी फक्त स्कुल टाईम शूजचीच जाहिरात केली नव्हती, तर तो मॅगी आणि बॅन्डेजच्या जाहिरातीत सुद्धा दिसला. हेच नाही तर तो पहिला नशाच्या रिमिक्स व्हर्जनमध्ये दिसला होता. मात्र आता तो सिनेइंडस्ट्रीत कार्यरत नाही. आता तो एमडी असून कॅन्सरवर उपचार करताना वापरण्यात येणाऱ्या रेडिएशन उपचारांचा तज्ज्ञ आहे. तो रेडिएशन ऑन्कोलॉजीचे स्पेशालिस्ट आणि कॅन्सरवर उपचार करतो.
तेजनने २००८ साली नॉर्थ कैरोलीन युनिव्हर्सिटीतून बायोमेडिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर त्याने डॉक्टर ऑफ मेडिसिनच्या शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी ऑफ मॅरिलँड स्कुल ऑफ मेडिसीन जॉईंट केले. २०१३ मध्ये डॉक्टर ऑफ मेडिसीनचा शिक्षण पूर्ण करून डॉक्टर तेजनने एक वर्ष बाल्टीमोर, मेरिलॅन्डची मेडस्टर युनियन मेमोरियल हॉस्पिटलमध्ये इंटर्नशीप केली. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलॅन्ड मेडिकल सेंटरमधून आपली रेजिडेंसी कंप्लिट केली. त्याच वर्षी डॉ. तेजन दिवानजीने फॅकल्टी शिवाय युनिव्हर्सिटी ऑफ मियामीमध्ये रुजू झाला. आता तो सिल्वेस्टर कंप्रिहेन्सीव कॅन्सर सेंटरमध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजीचे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. डॉ. तेजन मेरिलॅन्ड येथे वास्तव्यास आहे.