‘उतरन’ मालिकेतली छोटी तपस्या आठवते का? आता ओळखणेही झाले कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 09:00 AM2021-11-11T09:00:00+5:302021-11-11T09:00:00+5:30
अभिनयाच्या क्षेत्रात परतण्याचा इशिताचा तूर्तास तरी कोणताही इरादा दिसत नसल्याचे स्पष्ट होते कारण. इशिताने अभिनयात नाही तर दुसऱ्याच क्षेत्रात करिअर बनवले आहे.
'उतरन' ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड गाजली होती. मालिकेतले सगळेच कलाकारांनी रसिकांची पसंती मिळवली होती. मालिकेतल्या दिग्गज कलाकारांबरोबर बालकलाकारांनी देखील उत्तम अभिनय करत रसिकांची पसंती मिळवली होती. त्याचं कधी निरागस कधी खोडकर असणं रसिकांना भावलं होतं. आता हे बालकलाकार मोठे झालेत आणि त्यामुळे त्यांचा लूकही फार बदलला आहे. तिचा लूक पाहून तुम्ही तिला ओळखणारही नाही.
मालिकेतले बालकालाकर आता कुठे आहेत ? कसे दिसत असतील ? अशी प्रश्न तुम्हालाही पडले असतील. मालिकेत इच्छा आणि तपस्या दोन बालकलाकांच्या भूमिका होत्या. तपस्या भूमिका इशिता पांचालने साकारली होती. या मालिकेनंतर इशिता 'अंबर धरा', 'सीआईडी', रियलिटी शो 'मां एक्सचेंज' मध्येही झळकली होती. इशिता ने पॉपुलर इंटरनेशनल रियलिटी शो 'वाइफ स्वैप'मध्येही झळकली होती. मालिका व्यतिरिक्त जॅकी श्रॉफसोबत 'भूत एंड फ्रेंड' मध्येही तिने काम केले होते. पण तपस्या म्हणूनच तिला जास्त ओळखले गेले. आजही तिला तपस्या या भूमिकेमुळेच जास्त ओळखले जाते. बालपणीच आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी इशिता अचानक पडद्यापासून दूर गेली. मुळात अभिनयापासून दूर जात तिने शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. आपलं शिक्षण पूर्ण करत असताना ती अभिनयापासून दूर गेली.
आता ती अभिनयात सक्रीय नसली तरी सोशल मीडियावर सक्रीय असते. इनस्टाग्रामवर इशिताच बरेच फोटो असून त्यात तिला ओळखणं कठीण आहे. विविध अंदाजातील फोटो शेअर करत असते. इशिता दिसायलाही फार सुंदर दिसते. इतकंच काय तर उतरन मालिकेच्या सेटवरचे जुने फोटो शेअर करत जुन्या आठवणींनाही उजाळा देत असते.
इशिता आता २२ वर्षांची झाली आहे. मुळात लहान असताना जितकी ती क्युट दिसायची आजही ती क्युट दिसते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अभिनयाच्या क्षेत्रात परतण्याचा इशिताचा तूर्तास तरी कोणताही इरादा दिसत नसल्याचे स्पष्ट होते कारण. इशिताने अभिनयात नाही तर दुसऱ्याच क्षेत्रात करिअर बनवले आहे. आता ती अभिनेत्री नसून डॉक्टर बनली आहे.