रेशम टिपणीस म्हणते ही दोस्ती तुटायची न्हाय, स्मिता गोंदकरसोबतचा फोटो केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 11:36 IST2019-09-11T11:31:42+5:302019-09-11T11:36:17+5:30
दोघीही बिग बॉस मराठी सीझन १च्या स्पर्धक होत्या. दोघींची ही मैत्री बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर चांगलीच बरहरलीय.

रेशम टिपणीस म्हणते ही दोस्ती तुटायची न्हाय, स्मिता गोंदकरसोबतचा फोटो केला शेअर
मराठी बिग बॉस या रिअॅलिटी शोनंतर रेशम टिपणीस हे नाव मराठी रसिकांच्या चर्चेचा विषय बनलं. हिंदी आणि मराठी सिनेमा तसंच मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी रेशम मध्यंतरीच्या काळात तितकी चर्चेत नव्हती. मात्र बिग बॉस हा मराठी रियालिटी शोमधील एंट्रीने रेशम पुन्हा रसिकांच्या मनात घर करुन गेली. रेशम मैत्रीसुद्धा तितक्याच दिलदारपणे निभावते. मित्र आणि मैत्रीणींच्या पाठिशी ती ठामपणे उभी राहते. तिच्या आणि हर्षदा खानविलकरच्या मैत्रीचे किस्सेही चित्रपटसृष्टीत ऐकायला मिळतात. सध्या रेशमची अभिनेत्री स्मिता गोंदकर हिच्याशी चांगलीच गट्टी जमलीय.
दोघेही 'बिग बॉस मराठी सीझन १'च्या स्पर्धक होत्या. दोघींची ही मैत्री बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर चांगलीच बहरलीय. नुकतंच रेशमने तिचा स्मितासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. कायमची घट्ट मैत्री असं कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. या फोटोवर रसिकांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे. 'बिग बॉस मराठी सीझन-१'चा आणखी एक सदस्य आस्ताद काळेनंही या फोटोला लाइक करत कमेंट दिलीय.