"वेसावची पारो..." गाण्यावर थिरकल्या रेश्मा शिंदे आणि ज्ञानदा रामतीर्थकर, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:10 IST2025-03-10T15:09:53+5:302025-03-10T15:10:31+5:30
Reshma Shinde and Dnyanada Ramtirthakar: अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती आणि ज्ञानदा रामतीर्थाकर कोळी गाणं वेसावची पारो नेसली गो गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

"वेसावची पारो..." गाण्यावर थिरकल्या रेश्मा शिंदे आणि ज्ञानदा रामतीर्थकर, व्हिडीओ व्हायरल
रेश्मा शिंदे (Reshma Shinde) आणि ज्ञानदा रामतीर्थाकर (Dnyanada Ramtirthakar) छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. सध्या रेश्मा घरोघरी मातीच्या चुली मालिकेत काम करताना दिसते आहे. तर ज्ञानदा रामतीर्थाकर लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेत काम करते आहे. नुकतेच या दोघी एकत्र आल्या होत्या. त्यांनी वेसावची पारो गाण्यावर डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती आणि ज्ञानदा रामतीर्थाकर कोळी गाणं वेसावची पारो नेसली गो गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत रेश्माने लिहिले की, आम्ही शाळेत असताना ह्या गाण्यावर नृत्य केले आहे. अशा काही तुमच्या आठवणी आहेत का? या व्हिडीओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसते आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
रेश्मा शिंदेच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. एका युजरने लिहिले की, तुझ्यामध्ये मराठी संस्कृती उठून दिसत आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की,एव्हरग्रीन गाणं.. कधीही नाचू शकतो. आणखी एकाने लिहिले की, जानकी वहिनी खूप कमाल डान्स केला. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केले आहेत.
वर्कफ्रंट
रेश्मा शिंदेला रंग माझा वेगळा मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली. मालिकेत तिने साकारलेली दीपा लोकांना खूपच भावली. या मालिकेनंतर आता ती घरोघरी मातीच्या चुली मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत तिने जानकीची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. आता ती 'लग्नानंतर होईलच प्रेम!' मालिकेत काम करताना दिसते आहे.