रेश्मा शिंदेची मंडपात रॉयल एन्ट्री, मित्रांचा कल्ला, श्रीरामाचं गाणं अन्.... शेअर केला लग्नाचा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 11:52 IST2024-12-08T11:51:34+5:302024-12-08T11:52:13+5:30
रेश्मानं लग्नाचा शानदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रेश्मा शिंदेची मंडपात रॉयल एन्ट्री, मित्रांचा कल्ला, श्रीरामाचं गाणं अन्.... शेअर केला लग्नाचा Video
Reshma Shinde Wedding Video : मराठी कलाविश्वात तिच्या खणखणीत अभिनयामुळे ओळखली जाणारी अभिनेत्रीरेश्मा शिंदेने (reshma shine) गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाइफमुळे खूप चर्चेत आहे. रेश्मा नुकतंच तिच्या दाक्षिणात्य बॉयफ्रेंड पवन याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. गेल्या आठवड्याभरापासून रेश्माच्या लग्नाची धामधूम सुरु होती. रेश्माने हळद, मेहंदीचे खास फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. आता रेश्मानं लग्नाचा शानदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
रेश्माने २९ नोव्हेंबरला महाराष्ट्रीयन आणि दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केले आहे. रेश्माच्या लग्नाला तिचे कुटुंबीय अन् मनोरंजन विश्वातील तिचे कलाकार मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. रेश्माचं लग्न होताच काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण, आता रेश्माने संपुर्ण लग्नाची झलक तिच्या चाहत्यांना दाखवली आहे. तिने लग्नातील एक Inside व्हिडीओ शेअर केला आहे. कन्नड भाषेत तिनं पतीसाठी लिहलं, 'ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಪ್ರೀತಿಸುತ್ತೇನೆ', याचा अर्थ 'I Love You' किंवा 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' असा होतो.
व्हिडीओच्या सुरुवातील रेश्मा म्हणते, "मी ठरवलं होतं रडायचं नाही. कारण, हा आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि सुंदर दिवस आहे. त्यात मला माहितीये I made a right choice! त्यामुळे मी नाही रडले". पुढे व्हिडीओमध्ये सुंदर सजवलेला लग्न मंडप दिसतो. श्री रामाच्या गाण्यावर रेश्मा थाटात एन्ट्री घेताना पाहायला मिळतेय.
यावेळी रेश्मा खूपच सुंदर दिसत होती. तिने ऑरेंज गोल्डन साडी परिधान केली होती. सदा सौभाग्यवती भव लिहिलेली चुनरी तिने डोक्यावर घेतली होती. तर पवनने गोल्डन रंगाची शेरवानी लुंगी परिधान केलेली पाहायला मिळतेय. मंगलाष्टकांच्या वेळी आई-बाबांबरोबर तिच्या सेलेब्रिटी मित्रांनाही अश्रू अनावर झाल्याचं दिसलं. तर लग्न लागल्यानंतर या सगळ्या मित्रांनी एकत्र येऊन बुमरोवर डान्स केला. दोघांच्या लग्नाच्या हा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेता विषय ठरला आहे.