“#चेंजहरनॉट” या सोशल मीडियावरील मोहिमेला प्रतिसाद!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 05:33 AM2018-02-05T05:33:06+5:302018-02-05T11:03:09+5:30

एखाद्या व्यक्तीच्या जीवनात विवाह ही एका नव्या धाडसी प्रवासाची सुरुवात असते. आपल्या भावी जोडीदाराकडून प्रत्येकाच्या बऱ्याच अपेक्षाही असतात. पण ...

Respond to the #changelnut campaign! | “#चेंजहरनॉट” या सोशल मीडियावरील मोहिमेला प्रतिसाद!

“#चेंजहरनॉट” या सोशल मीडियावरील मोहिमेला प्रतिसाद!

googlenewsNext
ाद्या व्यक्तीच्या जीवनात विवाह ही एका नव्या धाडसी प्रवासाची सुरुवात असते. आपल्या भावी जोडीदाराकडून प्रत्येकाच्या बऱ्याच अपेक्षाही असतात. पण आपल्याला आपण जसे आहोत, तसेच स्वीकारण्यासाठी  एखाद्या मुलीला काय काय करावे लागते? हा अनुभव केंद्रस्थानी ठेवून ‘झी टीव्ही’ने आपल्या ‘कलीरें’ या नव्या मालिकेद्वारे नवी मोहीम हाती घेतली आहे. महिलांना त्यांच्या मर्जीनुसार जीवन जगता आले पाहिजे, या मतावर ठाम असलेली सामाजिक कार्यकर्ती व निर्माती-अभिनेत्री गुल पनाग हिच्याशी या वाहिनीने सहकार्य केले आहे. तसेच त्यासाठी “#चेंजहरनॉट” नावाचा सोशल मीडियावर एक प्रयोग सुरू केला असून त्यावर भारतीय वरांना घरेलू, गौरवर्णीय सुंदरी, सुगरण आणि समाजाने ठरविलेल्या इतरही बऱ्याच पारंपरिक परंतु दुर्दैवी गटांतील वधू निवडण्याचे पर्याय उपलब्ध केले आहेत.

वास्तव जीवनातील या उघड वैगुण्यावर ढळढळीत प्रकाश टाकत असतानाच गुल पनाग या अभिनेत्रीने या संकेतस्थळावर केलेल्या वधूंच्या गटवारीविरोधात सोशल मीडियात आवाज उठवून त्यातील प्रतिगामी रूढींवर टीका केली आहे. 

हे संकेतस्थळ आणि “#चेंजहरनॉट” या सोशल मोहिमेचा खरा हेतू उघड होताच त्याला लाभलेल्या हजारो भारतीयांच्या प्रतिसादावरून हे दिसून आले की भारतीयांना आता पारंपरिक आणि रूढीग्रस्त समजुतींच्या दावणीला स्वत:ला बांधून घेऊ इच्छित नाहीत; उलट त्यांना आपले नशीब स्वत:च घडवायचे असून त्यासाठी ‘झी टीव्ही’च्या ‘आज लिखेंगे कल’ या नव्या ब्रॅण्ड परिचयाला त्यांनी समर्थन दिले आहे.

‘झी टीव्ही’च्या व्यवसाय विभागाचे उपाध्यक्ष दीपक राजाध्यक्ष म्हणाले, “’मायसोनीकुडी’विरोधात आता जो तीव्र संतापजनक प्रतिसाद निर्माण झाला आहे, तो तसा निर्माण व्हावा, या हेतूनेच हे संकेतस्थळ विकसित करण्यात आलं होतं. या संकेतस्थळाच्या माध्यमातून भावी वधूंची एखाद्या वस्तूप्रमाणे वर्गवारी करण्याच्या हिडीस प्रकारावर प्रकाश टाकणं हा हेतू होता आणि गुल पनागसारख्या सामाजिकदृष्ट्या संवेदनशील कलाकाराने या उपक्रमाला तात्काळ पाठिंबा दिला, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हे संकेतस्थळ जरी बनावट असलं, तरी दुर्दैवाने हा मुद्दा मात्र खरा आहे. लग्न करण्यासाठी भावी वधूमध्ये काही विशिष्ट कौशल्ये आणि गुणांची अपेक्षा केली जाणे, हा प्रकार दुर्दैवी आहे. घरेलू ते संस्कारी, गौरवर्णीय ते पाश्चिमात्य पोशाख न घालणारी, लठ्ठ पगाराची नोकरी असलेली ते करिअर न करणारी वगैरे ज्या विविध अपेक्षांचे साचे करण्यात आले आहेत, त्यात भावी वधूंना साचेबध्द करणाऱ्या काही संस्था निर्माण झाल्या आहेत. तसंच आमची ‘कलीरें’ ही नवी मालिका याच मुद्द्याला थेट हात घालते. समाजाच्या अशा विचित्र मागण्यांपुढे मान तुविण्यास नकार देऊन जीवन आपल्या मर्जी आणि अटींवर जगण्याचा, आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व कायम राखण्याचा निर्णय घेणाऱ्या मीरा या एका छोट्या गावात राहणाऱ्या मुलीची कथा या मालिकेत चित्रीत करण्यात आली आहे. समाजाच्या सुनेच्या साचेबध्द कल्पनांच्या निकषांपासून भारतीय महिलांना मुक्त करण्याचा आणि त्यांना त्या जशा आहेत, तशाच स्वीकार करणाऱ्या पुरुषांपुढे मीराचं उदाहरण ठेवणं हा आमचा हेतू होता.” अभिनेत्री गुल पनागने सांगितले, “मी आजवर नेहमीच माझ्या मर्जीनुसार जीवन जगले असून माझं व्यक्तिमत्त्व हे माझी स्वतंत्र ओळख निर्माण करतं, असं मला वाटतं. म्हणूनच केवळ लग्न करण्यासाठी तुम्हाला स्वत:त बदल घडवून आणायला लागतील, हा विचारही तिरस्करणीय वाटतो. लग्नापूर्वी मुलींना विशेष कौशल्यांचे प्रशिक्षण देणाऱ्या आणि त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अनावश्यक बदल घडवून सुयोग्य वधू बनविणाऱ्या अशा संस्था अस्तित्त्वात आहेत, हे झी टीव्हीने मला दाखवून दिल्यावर मला धक्काच बसला. त्यामुळेच मी या प्रकारच्या संस्थांविरोधात आवाज उठविण्यास आणि जनतेत जागृती करण्याच्या झीच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला. मेरीसोनीकुडी या संकेतस्थळावर म्हणूनच आम्ही गोरी चिट्टी बहू, संस्कारी बहू, नो वेस्टर्न क्लोदस् बहू आणि इतर अनेक विचित्र मागण्यांसाठी जी गटवारी निर्माण केली तिच्याविरोधात जो तीव्र प्रतिसाद उमटला, तो उमटावा म्हणूनच ही गटवारी आम्ही निर्माण केली होती. सोशल मीडियावर याविरोधात जो संताप निर्माण झाला, त्याबद्दल मी समाधानी आहे. हे संकेतस्थळ जरी बनावट असलं, तरी दुर्दैवाने हा मुद्दा मात्र खरा आहे. यापूर्वी ज्या प्रतिगामी रूढी आणि प्रथा सुरू आहेत, त्यांचा आंधळेपणाने स्वीकार करणं आपण आता सोडून दिलं पाहिजे आणि “#चेंजहरनॉट”वर त्यासंदर्भात चर्चा घडवून आणली पाहिजे. झी टीव्हीने देशात हा प्रश्न उपस्थित केल्याबद्दलच नव्हे, तर या विषयाला हात घालणारी कलीरेंसारखी मालिका निर्माण केल्याबद्दलही मी या वाहिनीची आभारी आहे. देशभरातील तरुण मुलींनी आपली ओळख स्वतंत्र ठेवली पाहिजे, निव्वळ लग्न करण्यासाठी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवू नये, याला ही मालिका प्रोत्साहन देते. या मालिकेला शुभेच्छा!” भावी वधूकडून अवाजवी अपेक्षा ठेवण्याच्या प्रथेविरोधात आणि ‘कलीरें’ची संकल्पना पूर्वनिश्चित प्रेक्षकांपुढे सदर करण्यासाठी झी टीव्ही लवकरच आणखी काही ‘एटीएल’ आणि ‘बीटीएल’ माहितीपट तयार करण्याच्या विचारात आहे. समाजाच्या उत्तमतेच्या समजुतीनुसार उत्तम पती मिळविण्यासाठी मुलींमध्ये बदल घडविणाऱ्या शाळांचे पंजाबमध्ये पेव फुटले आहे. उत्तम आणि भावी नवऱ्याच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी वधू कशी असावी, याचे प्रशिक्षण त्यात दिले जाते
आणि मुलींना त्यांच्या स्वभावाविरोधात आपल्यात बदल करून घेण्यास प्रवृत्त केले जाते. परंतु स्वच्छंदी आणि मनस्वी स्वभावाची, आपल्या मर्जीनुसार जीवन जगण्याची इच्छा असलेली मीरा आपल्या मूळ व्यक्तिमत्त्वात असे कृत्रिम बदल घडविण्यास नकार देते आणि आपण जसे आहोत, तसाच आपला स्वीकार करणाऱ्या पतीची प्रतीक्षा करते, असे ‘कलीरें’ या मालिकेचे कथानक आहे. या मालिकेतील मीरा या स्वच्छंदी नायिकेची भूमिका आदिती शर्मा ही नवी अभिनेत्री साकार करणार असून अर्जित तनेजा हा लोकप्रिय अभिनेता यात नायकाच्या भूमिकेत आहे.

आपल्या ‘आज लिखेंगे कल’ या नव्या ब्रॅण्ड जागृतीच्या माहितीपटाला मिळालेल्या तात्काळ प्रचंड प्रतिसादानंतर ‘झी टीव्ही’ने आपल्या सर्व नव्या मालिकांसाठी जारी केलेल्या नव्या माहितीपटांना, मग तो ‘आपके आ जाने से’साठी केलेला “#लायसन्सटूलव्ह” माहितीपट असो की ‘कलीरें’साठी केलेला “#चेंजहरनॉट” असो, मध्यमवर्गीय प्रेक्षकांमध्ये उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यावरून ‘झी टीव्ही’ला प्रेक्षकांची नाडी उत्तम कळली आहे, हेच सिध्द होते.

Web Title: Respond to the #changelnut campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.