म्हणून ‘जीजी माँ’मालिकेच्या टीमने शिर्डीला जाऊन घेतले साईबाबांचे आशिर्वाद!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 09:13 AM2017-10-12T09:13:24+5:302017-10-12T14:43:24+5:30

एखाद्या नव्या मालिकेच्या प्रसारणापूर्वी ही मालिका प्रेक्षकांपर्यंत पोहचावी म्हणून प्रमोशन करण्यात मालिकेची टीम बिझी असते.लवकरच 'जीजी माँ' ही नवीन ...

As a result, the 'GGM' team went to Shirdi and blessed the Saibaba! | म्हणून ‘जीजी माँ’मालिकेच्या टीमने शिर्डीला जाऊन घेतले साईबाबांचे आशिर्वाद!

म्हणून ‘जीजी माँ’मालिकेच्या टीमने शिर्डीला जाऊन घेतले साईबाबांचे आशिर्वाद!

googlenewsNext
ाद्या नव्या मालिकेच्या प्रसारणापूर्वी ही मालिका प्रेक्षकांपर्यंत पोहचावी म्हणून प्रमोशन करण्यात मालिकेची टीम बिझी असते.लवकरच 'जीजी माँ' ही नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.मालिकेला खूप चांगले यश मिळावं या मालिकेच्या टीमने शिर्डी गाठलं.मालिकेच्या संपूर्ण टीमने साईबाबांच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला.या मालिकेतील सर्व कलाकारांनी शिर्डीला जाण्यासाठी दोन दिवसांचा वेळ काढला होता.  ‘जीजी माँ’! जय आणि किन्नरी मेहता हे निर्माते असोत की साधा कलाकार, सर्वच जण या तीर्थयात्रेमुळे खुश झालेले दिसतात.मेहता प्रॉडक्शन्स या निर्मात्या कंपनीने यावेळी सर्वांसाठी ‘जीजी माँ’ लिहिलेले खास टी-शर्ट सर्वांना घालायला लावले होते.यावरून या तीर्थयात्रेसाठी निर्मात्यांनी केलेला खर्च आणि त्यांची साईबाबांवरील आस्थाही दिसून येते.

‘जीजी माँ’ची भूमिका साकारणारी तन्वी डोग्रा म्हणाली,“‘जीजी माँ’च्या या सर्व चांगल्या कलाकारांच्या टीमचा मी सुध्दा एक भाग बनल्याचं पाहून मी खूप लकी आहे असं मला वाटतं. आमच्या नव्या मालिकेसाठी साईबाबांचे आशीर्वाद घेतल्यावर आम्ही शिर्डीला खूपच धमाल केली.या मालिकेच्या प्रसारणासाठी आम्ही सर्वजण खूपच उत्सुक आहोत.शिर्डीची यात्रा माझ्या नेहमीच स्मरणात राहील.” ‘जीजी माँ’ ही मालिका येत्या 9 ऑक्टोबरपासून रसिकांच्या भेटीला येणार आहे.या मालिकेत तन्वी डोग्रा, भाविका शर्मा, दिशांक अरोरा, सुभाशिष झा, राजीव पॉल, पल्लवी प्रधान या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

जीजी माँ या मालिकेत राजस्थानमधील जयपूरमध्ये राहणा-या फाल्गुनी आणि नियती पुरोहित या दोन बहिणींची कथा पाहायला मिळणार आहे.या दोन बहिणींमधील प्रेमाचं आणि आपलेपणाचं जे सुंदर नातं आहे, ते प्रेक्षकांचं मन नक्कीच काबीज करील. या मालिकेत पल्लवी प्रधानने पहिल्यांदा नकारात्मक भूमिका रंगवली आहे. 'जीजी माँ’ मालिकेची पटकथा मयूर पुरी (चित्रपट- ‘ओम शांती ओम’ आणि ‘हॅपी न्यू ईयर’) या बॉलिवूडच्या प्रसिध्द पटकथालेखकाने लिहिली असून रोहितराज आनंद यांनी (दिग्दर्शन- ‘दिया और बाती हम’ मालिका) दिग्दर्शन केले आहे.

Web Title: As a result, the 'GGM' team went to Shirdi and blessed the Saibaba!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.