'सोनपरी' चं रियुनियन! २४ वर्षांनंतर एकत्र आले फ्रुटी, अल्टू अंकल अन् सोनपरी; शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 11:04 AM2024-09-03T11:04:13+5:302024-09-03T11:05:04+5:30

'शाका लाका बुमबुम', 'शक्तीमान', 'सोनपरी' यासह काही मालिका अनेकांना आपल्या बालपणीची आठवण करुन देतात.

Reunion of Son Pari after 24 years Mrinal Kulkarni Tanvi Hegde and Ashok Lokhande | 'सोनपरी' चं रियुनियन! २४ वर्षांनंतर एकत्र आले फ्रुटी, अल्टू अंकल अन् सोनपरी; शेअर केला फोटो

'सोनपरी' चं रियुनियन! २४ वर्षांनंतर एकत्र आले फ्रुटी, अल्टू अंकल अन् सोनपरी; शेअर केला फोटो

'शाका लाका बुमबुम', 'शक्तीमान', 'सोनपरी' (Sonpari) यासह काही मालिका अनेकांना आपल्या बालपणीची आठवण करुन देतात. लहान मुलांसाठी या मालिकांची जबरदस्त क्रेझ होती. 'सोनपरी' मालिकेत आपल्या मराठमोळ्या मृणाल कुलकर्णीने (Mrinal Kulkarni) सोनपरीची भूमिका साकारली होती. तर फ्रुटीची भूमिका तन्वी हेगडेने (Tanvi Hegde) निभावली होती. तिच्याजवळ नेहमी सोनपरी आणि अल्टू अंकल असायचे. ही फ्रुटी आता मोठी झाली असून २४ वर्षांनी तिने सोनपरी आणि अल्टू अंकलसोबत फोटो शेअर केला आहे.

तन्वी हेगडेने आपल्या सहकलाकारांसोबत फोटो शेअर केला आहे. सोनपरीच्या पोस्टरवर जसा फोटो आहे तोच फोटो आता त्यांनी २४ वर्षांनी रिक्रिएट केला आहे. मध्ये फ्रुटी तर बाजूला सोनपरी म्हणजेच मृणाल कुलकर्णी आणि अल्टू अंकल म्हणजेच अशोक लोखंडे आहेत. फ्रुटीने दोघांच्या हनुवटीवर हात ठेवला आहे. अगदी नॉस्टॅल्जिक असा हा फोटो आहे. तन्वीने फोटो शेअर करत लिहिले, "बरेच जण मला विचारतात की तुम्ही अजूनही भेटता का, संपर्कात आहात का आणि एकत्र कधी दिसाल. आम्ही तुमची इच्छा पूर्ण केली आहे. सेटवरचे माझे पालकच आहेत हे आणि बेस्ट सहकलाकार आहेत. आठवणींना उजाळा मिळाला."


तन्वी हेगडे 'वरवरचे वधू' हे नाटक बघण्यासाठी आली होती. मृणाल कुलकर्णीचा लेक विराजसनेच हे नाटक लिहिले आणि दिग्दर्शित केले आहे. या नाटकानंतर सोनपरीचं हे रियुनयन झालं. तन्वीच्या या पोस्टवर चाहत्यांनीही भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. 'कमबॅक करा प्लीज','बचपन की यादें','आणखी एक सीझन घेऊन या' असं म्हणत चाहते व्यक्त झाले आहेत. 

Web Title: Reunion of Son Pari after 24 years Mrinal Kulkarni Tanvi Hegde and Ashok Lokhande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.