शुबमन गिलसोबतच्या डेटिंगच्या चर्चेवर रिधिमा पंडितने सोडलं मौन, म्हणाली - मी "त्याचा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 03:49 PM2024-07-12T15:49:17+5:302024-07-12T15:50:05+5:30

Ridhima Pandit And Shubhman Gill : अभिनेत्री रिधिमा पंडित ग्लॅमरस अदा आणि दमदार अभिनयामुळे चर्चेत येत असते. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अभिनेत्री आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे तिचे नाव क्रिकेटर शुबमन गिलसोबत जोडले आहे.

Riddhima Pandit breaks silence on Shubman Gill dating talk, says - I'm 'his...' | शुबमन गिलसोबतच्या डेटिंगच्या चर्चेवर रिधिमा पंडितने सोडलं मौन, म्हणाली - मी "त्याचा..."

शुबमन गिलसोबतच्या डेटिंगच्या चर्चेवर रिधिमा पंडितने सोडलं मौन, म्हणाली - मी "त्याचा..."

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री रिधिमा पंडित (Ridhima Pandit) ग्लॅमरस अदा आणि दमदार अभिनयामुळे चर्चेत येत असते. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अभिनेत्री आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे तिचे नाव क्रिकेटर शुबमन गिल(Shubhman Gill)सोबत जोडले आहे. अचानक एक दिवस वृत्त आले की, रिधिमा शुबमनला डेट करते आहे. मात्र लगेच अभिनेत्रीने ही अफवा असल्याचे सांगितले. आता तिने या चर्चेवर मौन सोडले आहे. ती म्हणाली की, माझ्यात आणि शुबमनमध्ये डेटिंगची अफवा अजिबात पीआर स्टंट नव्हता. हे सगळं करायचं असतं तर मी बिग बॉसमध्ये केले असते. 

रिधिमा पंडितने २०१६ साली मालिका बहू हमारी रजनीकांतमधून पदार्पण केले होते. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली की, मी प्रोफेशनल लाइफला खूप महत्त्व देते. मी इथवर पोहचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

इंडस्ट्रीत अफवा पसरण्याबद्दल ती म्हणाली की, सध्या अफवा पसरवणे खूप सोप्पे आहे. ही चांगली बाब आहे की, माझे नाव शुबमन गिलसोबत जोडले. तो प्रतिभावान क्रिकेटर आहे आणि मी त्याचा खूप सन्मान करते, पण लोक माझे नाव अशा व्यक्तींसोबत जोडू शकतात जे ७५ वर्षीय आहे आणि लोकांना यावर विश्वास देखील बसतो.

आगामी प्रोजेक्ट
रिधिमा पंडितने आगामी प्रोजेक्टबद्दलही सांगितले. ती म्हणाली की, कधी कधी चांगले प्रोजेक्ट मिळण्यासाठी वेळ लागतो. मी सकारात्मक होऊन वाट पाहते. ती लवकरच नीरज पांडेच्या आगामी ओटीटी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. पुढे ती म्हणाली की, मला काही म्युझिक व्हिडीओ आणि टेलिव्हिजनवरील मालिकेत छोट्या भूमिकांच्या ऑफर्स आल्या पण त्या करण्यात काहीच रस नाही. ती सोशल मीडियावर खूप पॉप्युलर आहे आणि चाहते तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

Web Title: Riddhima Pandit breaks silence on Shubman Gill dating talk, says - I'm 'his...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.