रिहा शर्माच्या सोनेरी केसांचं गुपित लवकरच होणार उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 07:00 AM2018-02-09T07:00:14+5:302018-02-09T12:30:14+5:30

छोट्या पडद्यावरच्या बहु नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात.आता आणखीन एक बहु आपल्या लूकमुळे लक्षवेधी ठरली आहे. या ...

Riha Sharma's secret to reveal the secret of golden hair soon | रिहा शर्माच्या सोनेरी केसांचं गुपित लवकरच होणार उघड

रिहा शर्माच्या सोनेरी केसांचं गुपित लवकरच होणार उघड

googlenewsNext
ट्या पडद्यावरच्या बहु नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात.आता आणखीन एक बहु आपल्या लूकमुळे लक्षवेधी ठरली आहे. या बहूने आपल्या कपड्यांच्या फॅशनने नेहमीच एक नवा ट्रेंड निर्माण केला आहे.मग तो ट्रेंड त्यांच्या डिझायनर साड्यांचा असो,डिझायनर दागिन्यांचा असो नेहमीच त्या त्यांच्या हटके स्टाइलमुळे महिला वर्गात चर्चेचा विषय ठरतो आहे.अलीकडेच अशाच एका लोकप्रिय बहू कनकनेही तिची हेअर स्टाइल चेंज करत - मासी साला जाळ्यात पकडण्यासाठी नवे रूप धारण केले होते.‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’ मालिकेच्या कलाकारांनी त्यांचे परदेशातील स्थळांवरील पहिलेच चित्रीकरण बँकॉकमध्ये केले. तेव्हा या नव्या कथानकाला साजेसे रूप देण्यासाठी कनक म्हणजेच अभिनेत्री रिहा शर्माने आपल्या भूमिकेसाठी अशा प्रकारे हेअर स्टाइल करून घेतली होती.सेटवरील सूत्रांनी सांगितले की यावेळी प्रेक्षकांना कनकचे ब्लॉण्ड रूप (सोनेरी केस) पाहायला मिळेल. आपले बदललेले रूप निश्चित करण्यापूर्वी रिहा शर्माने 10-12 प्रकारच्या केशभूषेची चाचणी घेतली होती.त्यानंतरच तिने आपले केस सोनेरी रंगात रंगविले.आपल्या या रूपाने मावशीला जाळ्यात पकडून उमाशंकरचे निरपराध असल्याचे ती सिध्द करते.आगामी भागात अनेक रंजक वळण रसिकांना पाहायला मिळणार असून तुर्तास कनकला या नव्या रूपात पाहण्यासाठी रसिकही उत्सुक असतील हे मात्र नक्की.


Also Read:'तू सुरज मैं सांज पियाजी' फेम मधुरा नाईकचा हॉट अवतार

तू सुरज मैं सांज पियाजी हा दिया और बातीचा दुसरा सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेतील सगळ्या व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना पसंत पडत आहेत.या मालिकेत प्रेक्षकांना सगळे नवे कलाकार पाहायला मिळत असले तरी या नव्या कलाकारांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळत आहे.'तू सुरज मैं सांज पियाजी' या मालिकेत पालोमी अतिशय संस्कारी, प्रत्येकाच्या शब्दाला मान देणारी मुलगी असल्याचे आपल्याला दाखवण्यात आले आहे. या मालिकेत ही भूमिका मधुरा नाईक साकारत आहे. मधुरा खऱ्या आयुष्यात या व्यक्तिरेखेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ती तिच्या खऱ्या आयुष्यात अतिशय बोल्ड असून ती अनेकवेळा पाश्चिमात्य कपड्यांमध्येच पाहायला मिळते. ती नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगला विविध फोटो शेअर करत असते. तिने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केले असून यातील काही फोटोदेखील सोशल माडियाला पोस्ट केले आहेत. या सगळ्याच फोटोंमध्ये तिने शॉर्ट कपडे घातले आहे आणि विशेष म्हणजे यातील काही फोटोंमध्ये मधुराने बिकनीदेखील घातली आहे. 

Web Title: Riha Sharma's secret to reveal the secret of golden hair soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.