ईशा केसकरसाठी ऋषीची स्पेशल पोस्ट, रोमॅन्टिक फोटो शेअर करत व्यक्त केलं प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 01:18 PM2021-11-12T13:18:42+5:302021-11-12T13:19:48+5:30

कालच Isha Keskarचा वाढदिवस झाला आणि ऋषीनं तिच्यासाठी लिहिलेल्या खास पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं. 

rishi saxena heartwarming note for girlfriend isha keskar | ईशा केसकरसाठी ऋषीची स्पेशल पोस्ट, रोमॅन्टिक फोटो शेअर करत व्यक्त केलं प्रेम

ईशा केसकरसाठी ऋषीची स्पेशल पोस्ट, रोमॅन्टिक फोटो शेअर करत व्यक्त केलं प्रेम

googlenewsNext

‘जय मल्हार’ या मालिकेत ‘बानू’च्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री ईशा केसकर (Isha Keskar ) पाहता पाहता प्रेक्षकांची लाडकी बनली. यानंतर ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेमध्ये ‘शनाया’ची भूमिका साकारून घराघरात पोहोचली आणि पुढे तिच्या पर्सनल लाईफची चर्चा सुरू झाली. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता ऋषी सक्सेना (Rishi Saxena) आणि ईशाच्या प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्या. ईशा व ऋषी दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. कालच ईशाचा वाढदिवस झाला आणि ऋषीनं तिच्यासाठी लिहिलेल्या खास पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं. 
  रोमॅन्टिक फोटो शेअर करत ऋषीने ईशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

‘प्रत्येक सरत्या वर्षासोबत तुझी प्रगती होईल, तू एक व्यक्ती म्हणून तू प्रगल्भ होशील. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू आणखी खंबीर आणि साहसी होशील. आयुष्यातील वाईट आणि चांगल्या परिस्थितीत माझी साथ दिलीस. तुला यश, ताकद आणि अर्थातच भरपूर प्रेम मिळो. हॅपी बर्थडे स्ट्राँग गर्ल, खूप प्रेम,’अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘काहे दिया परदेस’ या मालिकेत अभिनेता ऋषी सक्सेनाने शिवची भूमिका केली होती. ऋषी हा अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे मन जिंकले होते.
 2018 मध्ये, इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ईशासोबतचा फोटो पोस्ट करत ऋषीने रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं.  
‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर ईशा व ऋषी यांची पहिली भेट झाली होती. या पहिल्याच भेटीत ऋषीच्या शांत स्वभावावर इशा भाळली होती. अर्थात पहिल्या भेटीत काहीही बोलणं झालं नव्हतं.  यानंतर झी मराठी पुरस्कारांच्या निमित्ताने ईशा व ऋषी यांचं बोलणं सुरू झालं आणि ईशानेच ऋषीला कॉफीसाठी विचारलं. पुढे मैत्री बहरली आणि एकदिवस ही मैत्री प्रेमाच्या कबुलीपर्यंत आली.
आताश: या प्रेमाला 4 वर्षे पूर्ण झाली आहेत. हे दोघे आता कधी लग्न करणार? याविषयी चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. दोघे ही सतत एकमेकांचे रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसतात. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांकडून नेहमीच पसंती मिळते. चाहते या दोघांच्या फोटोंवर भरभरुन प्रतिक्रिया आणि लाईक्स देताना दिसतात.  

Web Title: rishi saxena heartwarming note for girlfriend isha keskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.