Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस'च्या सर्व सीझनमधील आवडता स्पर्धक कोण?, रितेश देशमुखने घेतलं 'हे' नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 18:22 IST2024-07-22T18:22:06+5:302024-07-22T18:22:48+5:30
आज बिग बॉस मराठी 5 ची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी रितेशने आतापर्यंतच्या स्पर्धकांपैकी त्याला आवडणाऱ्या स्पर्धकाचं नाव सांगितलं.

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस'च्या सर्व सीझनमधील आवडता स्पर्धक कोण?, रितेश देशमुखने घेतलं 'हे' नाव
बिग बॉस मराठी सीझन 5 ला लवकरच सुरुवात होत आहे. २८ जुलै रोजी सर्वांचा आवडता रिएलिटी शो प्रसारित होत आहे. यंदा महेश मांजरेकरांच्या जागी आपला लयभारी अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) शो होस्ट करणार आहे. 'आता कल्ला होणारच' असं म्हणत त्याचा अलीकडेच प्रोमोही रिलीज झाला. शोआधी आज बिग बॉस मराठी 5 ची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी रितेशने आतापर्यंतच्या स्पर्धकांपैकी त्याला आवडणाऱ्या स्पर्धकाचं नाव सांगितलं.
रितेश देशमुख बिग बॉसच्या होस्टची धुरा सांभाळणार आहे. याआधी हिंदीत सलमानची वेगळीच क्रेझ आहे. तर मराठीत महेश मांजरेकरांनीही प्रेक्षकांचं मन जिंकलं. आता रितेशसमोर आव्हान असणार आहे. बिग बॉस मराठी 5 च्या प्रेस कॉन्फरन्सवेळी रितेशला याआधीच्या सर्व सीझनमधला आवडता स्पर्धक कोण असा प्रश्न विचारण्यात आला. यावर रितेश म्हणाला, "एवढे सीझन मी पाहिले आहेत मराठी असो किंवा हिंदी. त्यामुळे आता सर्व सीझननंतर कोण कोणत्या सीझनमध्ये होतं यात जरा गोंधळ उडतो. पण मला शिव ठाकरे आवडतो. मराठी आणि हिंदी अशा दोन्हीमध्ये माझा तो फेवरेट होता."
अमरावतीचा शिव ठाकरे 'बिग बॉस मराठी 2'चा विजेता ठरला होता. तसंच तो हिंदी बिग बॉस १६ मध्येही होता. तिथे तो रनर राहिला. शिव ठाकरेने आपल्या प्रेमळ स्वभावाने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं होतं.
रितेश देशमुखला बिग बॉसला आता बिग बॉस मध्ये होस्टच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. २८ जुलैला बिग बॉस मराठी 5 चा प्रीमियर होणार आहे.