'तुम्हाला आलेला राग, झालेला त्रास सगळं खोटं..'; रितेशभाऊ सर्वांसमोर करणार अरबाजची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 04:46 PM2024-08-31T16:46:22+5:302024-08-31T16:46:43+5:30

रितेश देशमुख आज भाऊच्या धक्क्यावर अरबाज पटेलची चांगलीच पोलखोल करणार आहे (bigg boss marathi 5)

Riteish deshmukh angry on arbaz patel in bigg boss marathi 5 new promo viral | 'तुम्हाला आलेला राग, झालेला त्रास सगळं खोटं..'; रितेशभाऊ सर्वांसमोर करणार अरबाजची पोलखोल

'तुम्हाला आलेला राग, झालेला त्रास सगळं खोटं..'; रितेशभाऊ सर्वांसमोर करणार अरबाजची पोलखोल

आज बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये पाचव्या आठवड्यातला भाऊचा धक्का रंगणार आहे.  या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख पुन्हा फायर मोडमध्ये दिसतोय. या आठवड्यात संपूर्ण सहा-सात दिवस अरबाज पटेलला निक्कीच्या वागण्याचा त्रास झाला असं दिसलं. त्याने घरात त्यासाठी भांडणंही केली. अरबाजने निक्कीशी वैर धरल्याने बी टीमशी हातमिळवणी केली. पण हे सर्व खोटं असल्याचं रितेशभाऊ उघडकीस आणणार आहे.

रितेशभाऊने अरबाजला सुनावलं

बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये रितेश देशमुख पुन्हा एकदा गेल्या आठवड्यासारखा फायर मोडमध्ये दिसतोय. रितेश देशमुखने यावेळी अरबाजची चांगलीच पोलखोल केलीय. रितेश म्हणाला, "प्रेक्षकांना दिसत होती दोन indivitual माणसं आणि दहा जणांची टोळी. या टोळीचा म्होरक्या होता अरबाज पटेल. तुम्हाला आलेला राग खोटा, तुम्हाला झालेला त्रासही खोटा. त्यामुळे सगळ्यांचे डोळे उघडण्यासाठी मी ओपन करतोय चक्रVIEW रूम."


अरबाजच्या वागण्याचा सर्वांना बसणार धक्का

पुढे भाऊच्या धक्क्यावर आज रितेश भाऊ अरबाजला निक्कीने अभिजीतसोबत केलेली कोणती गोष्ट आवडली नाही? हा प्रश्न विचारणार आहे. त्यानंतर अरबाजचं उत्तर जाणून घेतल्यानंतर रितेश भाऊ त्याला भाऊच्या चक्रव्युहात घेऊन जाणार आहे. रितेश म्हणतोय,"तुम्ही निक्कीच्या बाजूने आहात..त्यांच्या फेव्हरमध्येच आहात हेच मी आता दाखवणार आहे. अरबाज तुम्ही रिअॅलिटी शो केले आहेत. पण हा 'बिग बॉस मराठी' आहे. इथे फक्त रिअॅलिटी चालते". सगळ्यांना सत्य कळल्यासाठी भाऊच्या धक्क्यावर रितेशने चक्रव्युहू रूम उघडली आहे. अरबाजचं वागणं बघून सर्वांनाच धक्का बसलेला दिसतोय.
 

Web Title: Riteish deshmukh angry on arbaz patel in bigg boss marathi 5 new promo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.