एअरपोर्ट, ग्रँड फिनाले अन् सूरजला मारलेली मिठी! रितेश देशमुखने शेअर केले पडद्यामागचे जादुई क्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 03:24 PM2024-10-07T15:24:56+5:302024-10-07T15:25:58+5:30
रितेशने त्याच्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
BB Marathi Grand Finale: 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेची रविवारी रात्री सांगता झाली. गुलगित किंग सुरज चव्हाण हा 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. यंदाचा सीझन हा खास होता. कारण, पहिल्यांदाच रितेश देशमुखने होस्टिंगची धुरा सांभाळली होती. रितेशच्या भाऊच्या धक्क्याला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. पण, परदेशातील शूटिंगमुळे दोन आठवडे रितेश भाऊच्या धक्क्यावरु गायब होता. पण, खास ग्रँड फिनालेसाठी परदेशातील शूटिंगमधून ब्रेक घेत रितेश मायदेशी परतला होता. आता रितेशचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
रितेशने त्याच्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ खूपच भारी आहे. यामध्ये व्हिडीओच्या सुरुवातीला युरोपवरुन मुंबई एअरपोर्टवर पोहचलेला रितेश दिसतोय. त्यानंतर व्हिडीओत फिल्मसीटी आणि 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेचा सेट दिसतोय. तसेच ग्रँड फिनालेनंतर पडद्यामागे रितेश आणि सुरजमधील संवाद आणि त्यांची खास मिठी असे जादुई क्षणही व्हि़डीओमध्ये पाहायला मिळताय.
व्हिडीओसोबतच कॅप्शनमध्ये रितेशने लिहलं, "कार्यक्रमावर एवढ्या मोठ्या प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार". रितेशच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन लाईक आणि कमेंट केल्या आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनला रितेश देशमुखमुळे एक वेगळेच वलय प्राप्त झालं होतं.
दरम्यान, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, धनंजय पोवार हे सदस्य फिनालेमध्ये पोहचले. पण, या शर्यतीमधून पहिल्यांदा जान्हवी किल्लेकर ही बाहेर पडली आहे. त्यानंतर अंकिता वालावलकर, धनंजय पोवार हे शर्यतीतून आऊट झाले. तर सुरज चव्हाण, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी हे टॉप ३ मध्ये पोहचले. त्यानंतर निक्कीचाही खेळ संपला आणि टॉप २ मध्ये सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत पोहचले. अखेर सुरजच्या हाती 'बिग बॉस'ची ट्रॉफी आली आणि अभिजीत सावंत हा रनर अप ठरला.