"मला चित्रपटात कधीच काम करायचं नव्हतं पण..."; रितेश देशमुख पहिल्यांदाच मनातलं बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 01:55 PM2024-07-26T13:55:15+5:302024-07-26T13:56:56+5:30

रितेश देशमुखने 'बिग बॉस मराठी ५' च्या प्रेस कॉन्फरन्सवेळी पहिल्यांदाच मनातल्या भावना व्यक्त केल्या (bigg boss marathi 5, riteish deshmukh)

Riteish Deshmukh spoke about his filmy career on bigg boss marathi 5 colors marathi | "मला चित्रपटात कधीच काम करायचं नव्हतं पण..."; रितेश देशमुख पहिल्यांदाच मनातलं बोलला

"मला चित्रपटात कधीच काम करायचं नव्हतं पण..."; रितेश देशमुख पहिल्यांदाच मनातलं बोलला

'बिग बॉस मराठी ५'ची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. रितेश देशमुख यंदाच्या सीझनचं होस्टिंग करत आहे. त्यामुळे सर्वांनाच रितेश 'बिग बॉस मराठी ५'चं होस्टिंग कसं करतो हे पाहायचं आहे. 'बिग बॉस मराठी ५'मध्ये यंदा कोणते स्पर्धक सहभागी होणार याविषयी विविध चर्चा रंगत आहेत. अशातच 'बिग बॉस मराठी ५'च्या प्रेस कॉन्फरन्सवेळी रितेश त्याच्या मनातली एक गोष्ट बोलला. याशिवाय त्याने देवाचेही एका खास गोष्टीसाठी आभार मानले. 

रितेश देशमुख काय म्हणाला?

'बिग बॉस मराठी ५'च्या प्रेस कॉन्फरन्सवेळी रितेश देशमुखने त्याच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. रितेश म्हणाला, "मला चित्रपटात काम करायचं नव्हतं कधीच. एक संधी मिळाली. त्याला मी होकार दिला आणि आज २२ वर्ष झाली. देवाने अपेक्षेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त दिलंय मला. त्यामुळे देवाचे आभार" अशाप्रकारे रितेश देशमुखने पहिल्यांदाच त्याच्या मनातली गोष्ट शेअर केली.



या तारखेपासून रितेश करणार 'बिग बॉस मराठी'मध्ये दंगा

रितेश देशमुखचं होस्टिंग असणाऱ्या 'बिग बॉस मराठी ५'ची उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्राला आहे. रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी ५'च्या सूत्रसंचालनाची धुरा कशी सांभाळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. महेश मांजरेकांनी 'बिग बॉस मराठी'चे चारही सीझन त्यांच्या अफलातून अँकरींगने गाजवले. त्यामुळे आता रितेश या शोचं अँकरींग कसं करणार याची चर्चा आहे. २८ जुलैला रात्री ९ वाजता 'बिग बॉस मराठी ५'चा ग्रँड प्रिमियर होणार आहे. तर सोमवारपासून दररोज हा शो कलर्स मराठीवर पाहायला मिळेल.

Web Title: Riteish Deshmukh spoke about his filmy career on bigg boss marathi 5 colors marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.