'या' कारणामुळे रितेश देशमुख झाला भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 06:30 AM2018-12-08T06:30:00+5:302018-12-08T06:30:00+5:30
या आठवड्यामध्ये सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरच्या मंचावर “माऊली” चित्रपटाची टीम आली आहे. कार्यक्रमाच्या मंचावर या टीमची धम्माकेदार एन्ट्री झाली.
प्रेक्षकांना कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमामधील अवघ्या महाराष्ट्राचा लाडका बनलेला हर्षद नायबल हा प्रेक्षकांचा लाडका बनला असून तो कार्यक्रमाचा देखील एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. या आठवड्यामध्ये सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरच्या मंचावर “माऊली” चित्रपटाची टीम आली आहे. कार्यक्रमाच्या मंचावर या टीमची धम्माकेदार एन्ट्री झाली. तसेच आनंदीवरून खास वारकरी देखील बोलावले होते आणि छोट्या सुरवीरांनी “माऊली माऊली” हे अप्रतिम गाणे सादर केले आणि रितेश देशमुखने आपल्या संपूर्ण टीमची ओळख करून दिली. मंचावर हर्षद नायबल याने माऊली बनून खोट्या विटांची भिंत तोडून जबरदस्त एन्ट्री घेतली आणि काही डायलॉगस देखील म्हटले.
कार्यक्रमामध्ये छोट्या सुरविरांनी एका पेक्षा एक गाणी सादर करून माऊली टीम आणि कप्टन्सना खुश केले. मीराने बाबा थांब ना रे हे गाण सादर केले ज्यामुळे सिध्दार्थ जाधव, रितेश देशमुख खूपच भाऊक झाले. रितेश देशमुखने वडिलांच्या आठवणी देखील यावेळेस सांगितल्या. तसेच चैतन्यने सादर केलेल्या सर्फ लावून धूवून टाक या गाण्यावर संपूर्ण माऊलीच्या टीमने ठेका धरला. जितेंद्र जोशीने त्याची कविता सादर केली. स्वराली जाधवने नयना ठग लेंगे हे गाणे सादर केले तेव्हा माऊलीची संपूर्ण टीम भारावून गेली तसेच सिध्दार्थने सोफ्यावर उभे राहून गाण्याला दाद दिली... उत्कर्ष, आंशिका आणि सईने देखील उत्तम गाणी सादर केली. मीरा आणि सईने पिंगा, स्वराली आणि उत्कर्षने कबीरा मान जा आणि सक्षम आणि आंशिकाने कोंबडी पळाली...