'रोडिज' फेम प्रिन्स नरुला होणार बाबा; लग्नाच्या ६ वर्षांनी दिली गुडन्यूज, शेअर केला खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 08:49 AM2024-06-26T08:49:27+5:302024-06-26T08:49:55+5:30
प्रिन्सची पत्नी युविका गरोदर आहे. लग्नाच्या ६ वर्षांनी प्रिन्स आणि युविका आईबाबा होणार आहेत.
छोट्या पडद्यावरील चॉकलेट बॉय अशी ओळख मिळवलेला प्रिन्स नरुला कायमच चर्चेत असतो. अनेक रिएलिटी शोमध्ये सहभाग घेऊन प्रिन्सने प्रसिद्धी मिळवली. रिएलिटी शोचा स्पर्धक ते परिक्षक असा यशस्वी प्रवास त्याने केला आहे. प्रिन्स नरुलाच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. प्रिन्सची पत्नी युविका गरोदर आहे. लग्नाच्या ६ वर्षांनी प्रिन्स आणि युविका आईबाबा होणार आहेत.
प्रिन्सने सोशल मीडियावर एक गोड फोटो शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. प्रिन्सने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये दोन गाड्या दिसत आहेत. प्रिन्सच्या मोठ्या गाडीसारखीच एक छोटी गाडीही फोटोत पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत प्रिन्सने बाबा होणार असल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे.
प्रिन्स नरुलाची पोस्ट
माझ्या भावना कशा व्यक्त करू ते कळत नाहीये. आम्ही आनंदी आहोत पण, त्याबरोबरच थोडं नर्व्हसदेखील आहोत. देवाला धन्यावाद...पालक बनण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत. कारण, प्रिविका बेबी लवकरच येणार आहे. आता सगळं त्याच्यासाठी असणार...माझ्या आईवडिलांबरोबर युविका तूदेखील आता दुसऱ्या नंबरवर येशील. कारण, आता बेबी आपल्या आयुष्यात महत्त्वाचा असेल. जसं प्रत्येक पालक विचार करतात की जेव्हा मी बाबा होईल माझ्या मुलाला काही कमी पडता कामा नये. असाच विचार मीदेखील करायचो. याच्यासाठीच मी एवढी मेहनत घेतली. जसं आपल्या आईवडिलांना आपल्याला मोठं केलं. एक चांगला व्यक्ती म्हणून घडवलं. तशीच शिकवण आणि तेच संस्कार आपल्या मुलाला देण्याचा प्रयत्न करू.
प्रिन्सच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रिन्स आणि युविकाने २०१६मध्ये लग्नगाठ बांधली होती. बिग बॉसमध्ये ते पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. आता लग्नानंतर ६ वर्षांनी ते आईबाबा होण्यासाठी ते उत्सुक आहेत.