'निगेटिव्ह पब्लिसिटी नको असेल तर २५ लाख द्या',रोहित चौधरीने ‘केआरके’ची केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 05:36 PM2021-07-05T17:36:07+5:302021-07-05T17:43:04+5:30

करण जोहर, सलमान खान, हृतिक रोशन केआरकेपासून कोणीही त्याच्या तावडीतून सुटलेले नाही.

Rohit Choudhary Leaks KRK's Call Recording Of Blackmailing For Film Reviews | 'निगेटिव्ह पब्लिसिटी नको असेल तर २५ लाख द्या',रोहित चौधरीने ‘केआरके’ची केली पोलखोल

'निगेटिव्ह पब्लिसिटी नको असेल तर २५ लाख द्या',रोहित चौधरीने ‘केआरके’ची केली पोलखोल

googlenewsNext

सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे सगळ्यात आधी कोणत्या गोष्टीची चर्चा घडवून आणायची असेल तर त्यासाठी सोशल मीडियाचे माध्यमाशिवाय पर्याय नाही. कोणतीही गोष्ट असो सोशल मीडियावर त्याची चर्चा नाही झाली तरच नवल. सोशल मीडियावर कलाकारांना ट्रोल करण्याचेही प्रमाण वाढले आहे.  ट्रोलर्सच्या विरोधात आवाज उठवणेही गरजेचे आहे.

 

याविषयी अभिनेता रोहित चौधरीने याविरोधात आवाज उठवताना निशाणा साधला तो नेहमी चर्चेत असणारा ‘केआरके’वर.गेली कित्येक वर्षापासून सोशल मीडियावर तो नकारात्मक विचार पसरवताना दिसतो. चित्रपट उद्योगातील कोणालाही त्याने सोडलेले नाही. करण जोहर, सलमान खान, हृतिक रोशन आदींपासून अगदी कोणीही त्याच्या तावडीतून सुटलेले नाही. पण आता चित्रपट उद्योगातील व्यक्तींनी त्याच्या ट्रोलिंग करण्यावर बंदी आणली पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या काही मर्यादा असतात. 

अभिनेता रोहित चौधरीवरही ‘केआरके’ने अलीकडेच निशाणा साधला होता. पण रोहितने केआरकेची वेळीच प्रत्युत्तर देत तोंड बंद केले. रोहितने त्याच्या ट्वीटच्या माध्यमातून सडेतोड उत्तक दिले. केआरकेबद्दलची काही  मीम्स त्याने व्हायरल केली. ट्विटरवर #केआरकेब्लाकमेलर (#KRKBlackMailer) #रोहितचौधरी (#RohitChoudhary) या हॅशटॅगने व्हायरल करण्यात आले होते. केआरकेविरोधात दिवसभर चर्चेत राहिले होते.

‘केआरके’ने भूतकाळात केलेल्या काम पाहून ‘केआरके’वर हा हल्लाबोल करताना रोहितने पूर्ण तयारी केली होती. आपण जे काही बोलतो आणि करतो त्या सर्वांचे पुरावे आपल्याकडे असतील याची पूर्ण खात्री रोहितने करुन घेतली होती. रोहितने एक ऑडीओ क्लिपही व्हायरल केली होती. जिच्यामध्ये दिग्दर्शक-निर्माते अनिल शर्मा यांच्याकडून केआरके २५ लाख रुपयांची लाच घेताना ऐकायला मिळतो. त्यांच्या चित्रपटाची नकारात्मक प्रसिद्धी न करण्यासाठी हे पैसे तो शर्मा यांच्याकडून मागत होता आणि २५ लाख रुपये दिल्यास तो त्यांच्या चित्रपटाचा चांगला रिव्ह्यू करेल अशी शाश्वती त्याने दिली. त्यानंतर त्याने वाटाघाटी केल्या आणि नंतर ही रक्कम ५ लाखांवर आली. त्यानंतर २० लाख रुपये चांगल्या रिव्ह्यूसाठी मागितले होते.

Web Title: Rohit Choudhary Leaks KRK's Call Recording Of Blackmailing For Film Reviews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.