"साताऱ्याची माणसं Thar वेडी", रोहित मानेच्या घरी आली महिंद्रा थार; शेअर केला व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 10:23 IST2025-01-12T10:22:54+5:302025-01-12T10:23:43+5:30
आपल्या बायकोचा हात हातात घेत तो... 'माने या ना माने' साताऱ्याच्या रोहित मानेने शेअर केला व्हिडिओ

"साताऱ्याची माणसं Thar वेडी", रोहित मानेच्या घरी आली महिंद्रा थार; शेअर केला व्हिडिओ
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून सर्वांचं खळखळून मनोरंजन करणारा साताऱ्याचा रोहित माने(Rohit Mane). रोहितचं 'थार' गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. नुकतीच त्याने Thar घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. त्याच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आधी घर आणि आता गाडीही घेतल्याने रोहितचा आनंद गगनात मावेनासा झालाय. त्याच्या या या पोस्टच्या कॅप्शनने लक्ष वेधलंय.
'माने या ना माने' अशा नावाचं इन्स्टाग्राम हँडल असलेल्या रोहित मानेने कालच व्हिडिओ शेअर केला. आपल्या बायकोचा हात हातात घेत तो महिंद्राच्या शोरुममध्ये जातो. त्याची बायको पेपरवर सही करताना दिसले. आणि पुढल्या काही क्षणात काळ्या रंगाची Thar समोर दिसते. गाडीवरील लाल कापड बाजूला करत दोघंही आपल्या नव्या कारची झलक दाखवतात. पूजा करतात. यानंतर रोहित आणि त्याची बायको ड्राईव्हल जातात. सन रुफ, आकर्षक फीचर्स असलेली 'थार' रोहितच्या घरी आलेली आहे. 'साताऱ्याची माणसं Thar वेडी' असं मजेशीर कॅप्शन त्याने दिलं आहे. अंगावर शहारे येणारं म्युझिक त्याने या व्हिडिओला लावलं आहे.
रोहित मूळचा साताऱ्याचा आहे म्हणून त्याने असं मजेशीर कॅप्शन देत ही बातमी चाहत्यांना दिली. त्याच्या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. हास्यजत्रेतील कलाकार प्रियदर्शिनी, निखिल बने, चेतना भट यांनी त्याचं अभिनंदन केलंय. शिवाय चाहत्यांनीही 'भावा कडक' म्हणत त्याचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच रोहितने मुंबईत स्वत:चं घरंही घेतलं होतं.