PHOTOS : शुभमंगल सावधान...! रोहित राऊत व जुईली जोगळेकर अडकले लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 16:14 IST2022-01-23T12:07:42+5:302022-01-23T16:14:50+5:30

Rohit Raut and Juilee Joglekar : लग्नसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पहा लग्नसोहळ्याचे खास फोटो!

Rohit Raut and Juilee Joglekar tie the knot SEE wedding photoS | PHOTOS : शुभमंगल सावधान...! रोहित राऊत व जुईली जोगळेकर अडकले लग्नबंधनात

PHOTOS : शुभमंगल सावधान...! रोहित राऊत व जुईली जोगळेकर अडकले लग्नबंधनात

Rohit Raut and Juilee Joglekar: सारेगमप लिटिल चॅम्पमधून प्रसिद्ध झालेला गायक रोहित राऊत (Rohit Raut )अखेर लग्नबंधनात अडकला. आज रविवारी गायिका जुईली जोगळेकरसोबत (Juilee Joglekar) त्यानं लग्नगाठ बांधली. या लग्नाचे फोटो समोर आले आहेत आणि ते दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत.
पुण्यातील प्रसिद्ध ढेपेवाडा येथे रोहित व जुईलीचा लग्नसोहळा पार पडला. या शाही विवाहसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रोहित व जुईलीच्या लग्नाचे विधी सुरू होते.  सर्वप्रथम ग्रहमख, साखरपुडा, संगीत, मेहंदी, हळद अशा सर्व कार्यक्रमांचे फोटो व्हायरल झाले होते. आता दोघांच्या लग्नाच्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. नवदांम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

रोहित व जुईली 8 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी दोघांनी एकमेकांसोबतचा फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. रोहितची पत्नी जुईली ही सुद्धा गायिका आहे. ‘सूर नवा ध्यास नवा’ या शोमध्ये ती सहभागी झाली होती.

2009 साली झी मराठीवर ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चा पहिला सीझन भेटीला आला होता. रोहित राऊत या पहिल्या सीझनचा विजेता ठरला होता. त्यानंतर त्याने गायक म्हणून सिनेइंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. याच शोमध्ये जुईली जोगळेकर ही देखील स्पर्धक म्हणून आली होती. तेव्हा रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले आणि मग प्रेमात. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली दिली होती. त्या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते.

Web Title: Rohit Raut and Juilee Joglekar tie the knot SEE wedding photoS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.