'या' दिवसापासून सुरु होणार 'खतरों के खिलाडी १४', जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 12:18 PM2024-07-11T12:18:35+5:302024-07-11T12:19:15+5:30

रोहित शेट्टी सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचं रोमानियामध्ये सुरु असलेलं शुटिंग पुर्ण झालं आहे.

Rohit shetty Khatron Ke Khiladi Season 14 Start Date And Time In Hindi When And Where How To Watch | 'या' दिवसापासून सुरु होणार 'खतरों के खिलाडी १४', जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल?

'या' दिवसापासून सुरु होणार 'खतरों के खिलाडी १४', जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल?

लोकप्रिय टीव्ही शोपैकी एक असलेल्या 'खतरों के खिलाडी १४' ची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. रोहित शेट्टी सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचं रोमानियामध्ये सुरु असलेलं शुटिंग पुर्ण झालं आहे. सर्व स्पर्धक भारतात परतले आहेत. आता हा रिॲलिटी शो पाहण्यासाठी प्रेक्षकांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. 

येत्या १५ जुलैपासून हा शो सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे. याचा भव्य प्रीमियर जुलैमध्ये कलर्स वाहिनीवर होणार आहे. दरम्यान, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या शोचे फॅन पेज अनेकदा सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित अपडेट्स देत असतात. यावेळी 'खतरों के खिलाडी सीझन १४' मध्ये अनेक तगडे स्पर्धक आहेत. या शोचे आतापर्यंत १३ पर्व झाले आहेत. 

'खतरों के खिलाडी'चा हा १४ वा सीझन खूप रंजक असणार आहे. यावेळीचे स्टंट आणखी धोकादायक आणि रोमांचक असतील. 'खतरों के खिलाडी १४' मध्ये सहभागी झालेल्या सेलिब्रिटींमध्ये गश्मीर महाजनी, नियती फतनानी, असीम रियाझ, अभिषेक कुमार, शालीन , सुमोना चक्रवर्ती, शिल्पा शिंदे आणि कृष्णा श्रॉफ, निमृत कौर अल्हुवालिया, आशिष मेहरोत्रा, करणवीर मेहरा, आदिती शर्मा यांची नावे आहेत.

Web Title: Rohit shetty Khatron Ke Khiladi Season 14 Start Date And Time In Hindi When And Where How To Watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.